Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

Shiv Sena BJP Clash: उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेला शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद आता कल्याण-डोंबिवलीत पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत कमलेश निकम यांनी केलेल्या विधानाचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी समर्थन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2026 | 05:23 PM
शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

Follow Us
Follow Us:
  • रवींद्र चव्हाण यांच्यावरील विधानावरून राजकीय वातावरण तापले
  • रवींद्र चव्हाण यांच्याबाबत निकम यांनी जे विधान केले ते सत्य
  • शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांचे विधान
Shiv Sena BJP Clash: उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या राजकीय वादाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीत उमटू लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी केल्याने दोन्ही पक्षांमधील शाब्दिक संघर्ष तीव्र झाला आहे. लांडगे यांच्या विधानानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे. (Shiv Sena BJP Clash)

‘निकम यांनी रवींद्र चव्हाणांबाबत जे बोलले ते सत्य’

उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादात शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत विधान केले होते. या विधानाचे समर्थन करताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी निकम यांनी केलेले विधान सत्य असल्याचा दावा केला. तसेच निकम यांच्याकडे त्यांच्या विधानासंदर्भात पुरावे असल्याचेही लांडगे यांनी सांगितले. लांडगे यांच्या या भूमिकेमुळे उल्हासनगरमधील राजकीय वाद कल्याण-डोंबिवलीतही चर्चेचा विषय ठरला आहे.

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

‘भाजपने न केलेली कामे खासदार श्रीकांत शिंदेंनी केली’

गोपाल लांडगे यांनी भाजपवर टीका करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामांचाही उल्लेख केला. भाजपचे मंत्री आणि आमदार यांना जी कामे करता आली नाहीत, ती कामे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करून दाखवली, असा दावा लांडगे यांनी केला. तसेच उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत भाजपचे उमेदवार अपात्र ठरले. भाजपला पात्र उमेदवारही देता आले नाहीत. मात्र, या अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘आमच्या नेत्यांवर बोलण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची लायकी नाही’

गोपाल लांडगे यांच्या विधानानंतर कल्याण-डोंबिवलीतील भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. “आमच्या नेत्यांवर बोलण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची लायकी नाही,” अशा शब्दांत वरुण पाटील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबाबत करण्यात येणाऱ्या विधानांवरून भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘या चिल्लर गोष्टींमध्ये गोपाल लांडगेंनी पडायला नको होते’

केडीएमसीतील भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनीही गोपाल लांडगे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. गोपाल लांडगे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून, त्यांनी अशा किरकोळ वादात पडणे अपेक्षित नव्हते, असे कांबळे यांनी म्हटले. “या चिल्लर गोष्टींवर गोपाल लांडगे बोलतील, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती,” असे सांगत त्यांनी लांडगे यांच्या भूमिकेवर टीका केली. रवींद्र चव्हाण यांची राजकीय उंची काय आहे, हे संपूर्ण जगाला माहीत असल्याचेही कांबळे यांनी म्हटले.

उल्हासनगरमधील वाद कल्याण-डोंबिवलीत पोहोचला

उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेला स्थानिक राजकीय वाद आता कल्याण-डोंबिवलीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी कमलेश निकम यांच्या विधानाचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे भाजपच्या वरुण पाटील आणि शशिकांत कांबळे यांनी लांडगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. या शाब्दिक संघर्षामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.

वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार?

उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आता या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Web Title: Ulhasnagar shiv sena bjp clash gopal landge ravindra chavan controversy kalyan dombivli sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • BJP
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट
1

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
2

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
3

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.