Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “… हेच या सरकारचे धोरण”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही

महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै. अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2025 | 09:50 PM
Devendra Fadnavis: "... हेच या सरकारचे धोरण"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही

Devendra Fadnavis: "... हेच या सरकारचे धोरण"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही

Follow Us
Close
Follow Us:

1. हे सामान्य जनतेचे सरकार- मुख्यमंत्री फडणवीस
2. माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
3. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार हेच सरकारचे धोरण

ठाणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे आज स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कै. आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटनेसाठी एक संघटन उभे केले. आपल्या समाजातील लोकांच्या हितासाठी, माथाडी कामगारांच्या विकासासाठी एखादी व्यवस्था उभारण्यासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात.

LIVE | स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'गुणवंत कामगार पुरस्कार वितरण व माथाडी कामगार मेळावा' 🕧 दु. १२.२३ वा. | २५-९-२०२५📍नवी मुंबई. @NarendraMathadi#Maharashtra #NaviMumbai #MathadiKamgar https://t.co/IXCJZJIRO7 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2025

त्यापैकी कै. आमदार अण्णासाहेब पाटील हे एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै. अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली. या चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला.

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या चौकटीत राहून जे करणे आवश्यक आहे ते आम्ही निश्चित करू. नियमांनुसार माथाडी कामगारांना जे काही देता येईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी आभार मानले. त्यांनी माथाडी कामगारांच्या निवासासाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून दीड लाख उद्योजक निर्माण करता आले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Cm devendra fadnavis said will resolve the issues of mathadi workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • Thane news

संबंधित बातम्या

अजित पवार गटाला जोरदार झटका! ‘या’ बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम
1

अजित पवार गटाला जोरदार झटका! ‘या’ बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
2

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

Devendra Fadnavis: ड्रोनने केलेले पंचनामे स्वीकारले जाणार? मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले?
3

Devendra Fadnavis: ड्रोनने केलेले पंचनामे स्वीकारले जाणार? मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले?

“योग्य ती उपाययोजना करा, अन्यथा…”, कल्याणमधील वाहतूक कोंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
4

“योग्य ती उपाययोजना करा, अन्यथा…”, कल्याणमधील वाहतूक कोंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.