
Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "त्यांच्या निर्णयाला..."
सुनेत्रा पवार उद्या घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची उद्या महत्वाची बैठक
राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
🕣 8.30pm | 30-1-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/oMjdHEoU3f — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 30, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नितीन गडकरी आमचे नेते आणि मार्गदर्शक आहे. त्यामुळे ज्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्याशी चर्चा झाली. एक रूपरेषा ठरवण्यात आली आहे. उद्या किंवा परवा नावे अंतिम होणार आहेत. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष घेईल. भाजप आणि सरकार म्हणून ते जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही पाठीशी उभे राहू. अजित पवारांचे कुटुंब आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच्या निर्णयाला आमचे योग्य ते समर्थन असेल. अंतिम निर्णय जो असेल तो त्यांचा पक्ष घेईल.”
सुनेत्रा पवार रचणार इतिहास!
राज्याला लवकरच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. सुनेत्रा पवार उद्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. उद्या संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्या सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
Maharashtra Politics: सुनेत्रा पवार रचणार इतिहास! पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
उद्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदारांची एक बैठक होणार आहे. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देखील सुनेत्रा पवार यांची निवड केली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि नरेश अरोरा यांच्यात महत्वाची बैठक झाली असल्याचे समोर येत आहे.