सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? (फोटो- सोशल मीडिया)
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
उद्या सायंकाळी शपथविधी होण्याचा अंदाज
उद्या 11 वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदारांची बैठक
Sunetra Pawar: राज्याला लवकरच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. सुनेत्रा पवार उद्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. उद्या संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्या सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
उद्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदारांची एक बैठक होणार आहे. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देखील सुनेत्रा पवार यांची निवड केली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि नरेश अरोरा यांच्यात महत्वाची बैठक झाली असल्याचे समोर येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…






