Maharashtra Politics: धनंजय मुंडे कमबॅक करणार? फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, "हे त्यांच्या स्तरावर..."
१. वाल्मिक कराड प्रकरणामुळे मुंडेंना द्यावा लागला होता राजीनामा \
२. एका प्रकरणात क्लीनचीट मिळाल्याने मुंडेंचे कमबॅक होण्याची शक्यता
३. मंत्रिमंडळात घेतल्यास कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आता कोर्टाने एका प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात पुन्हा येणार का अशी चर्चा सुरु आहे. वाल्मिक कराड प्रकरणात मुंडे यांच्यावर प्रचंड आरोप आणि टीका झाली. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे मंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. वाल्मिक कराडचे नाव येताच धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सुरु झाले. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात कमबॅक होणार का यावर चर्चा सुरु झाली आहे. यावर आता मुख्यमंत्र्यानी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
धनंजय मुंडे यांनी माझी तीन वेळेस भेट घेतली. तीनही वेळेस विविध विषयांवर आमच्यात चर्चा झाली. त्यांच्याशी मंत्रिमंडळाबाबत किंवा मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. धनंजय मुंडे यांच्या स्तरावर मंत्रिमंडळाची चर्चा होत नाही. मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाविषयी चर्चा करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
Maharashtra Politics: राजकारणात ट्विस्ट! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांचे सूचक वक्तव्य
अजित पवारांचे सूचक वक्तव्य
धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराड प्रकरण आणि कृषी विभागाने केलेल्या आरोपांमुळे जोरदार टीका झाली होती. दरम्यान त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता कृषी विभागाने केलेल्या आरोपांमधून कोर्टाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी याबाबत भाष्य केले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
कृषी घोटाळ्यात ज्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले त्यानंतर त्यांना क्लिनचिट मिळाली. त्याच्याबद्दल दुसरी चौकशी सुरु आहे, या चौकशीत त्यांना निर्दोष ठरवले तर त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली जाईल.