Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत पुण्याहून बंगळुरूला इंडिगोच्या नियमित विमानाने प्रवास केला. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 15, 2026 | 08:00 PM
फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास (Photo Credit- X)

फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार!
  • ताफा सोडला, विशेष विमान नाकारले
  • फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज पुण्याहून बंगळुरूला विशेष विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित प्रवासी विमानाने रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा व्यावहारिक उदाहरणाद्वारे संदेश दिला आहे.

काल (गुरुवार) विधानभवनापर्यंत आपला नियमित ताफा टाळून बाइकने प्रवास केल्यानंतर, आजही श्री. फडणवीस यांनी सामान्य प्रवाशांसोबत विमान प्रवास करत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले. पुण्यावरून ते आर्ट ऑफ लिविंगच्या एका कार्यक्रमासाठी बंगळुरूकडे इंडिगोच्या सार्वजनिक विमानातून रवाना झाले.

विशेष विमान किंवा सरकारी विमानाऐवजी व्यावसायिक विमान कंपनीच्या नियमित फ्लाइटचा वापर करून त्यांनी पर्यावरणस्नेही, अर्थव्यवस्थेला पूरक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या वाहतुकीच्या सवयीला प्रोत्साहन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ताफा तर कमी केलाच पण काल बुलेट वरून वर्षा बंगल्यावरुन मंत्रालयात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी खासगी विमानाला नकार देऊन,सामान्य विमानाने प्रवास केला. राष्ट्रहित सर्वोपरी 🇮🇳❤️ pic.twitter.com/VBYuKTpo9g — शुभम कराड (@shubham_9909) May 15, 2026

मुख्यमंत्र्याचां मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यांची संख्या निम्म्यावर; सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना

पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून प्रतिसाद दिला आहे.

तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना काही विशिष्ट निर्देश दिले. मंत्र्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा (Convoys) आकार तात्काळ निम्म्यावर आणावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत पदाधिकारी किंवा विधानसभेच्या सदस्यांच्या (आमदारांच्या) सोबत वाहनांचा ताफा असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष विमाने किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करणे टाळावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सर्व मंत्र्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची कटिबद्धता दर्शवली पाहिजे. याव्यतिरिक्त, कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या वाहनांचा आढावा घेण्याचे आणि एकूण वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांना मुंबईत किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष बोलावण्याऐवजी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना बैठकांमध्ये सहभागी करून घ्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारी विभागांनी होर्डिंग्ज, फ्लेक्स बॅनर्स आणि भपकेबाज रोषणाई किंवा सजावट यांचा वापर करणे टाळावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

Third Mumbai: तिसऱ्या मुंबईमुळे पर्यावरणाला मोठा धोका, MMRDA विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Web Title: Cm devendra fadnavis travels by indigo flight to promote public transport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • IndiGo flight
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.