Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर पदांच्या वाटपावरून पक्षात कोणतीही गटबाजी किंवा नाराजी खपवून घेतली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 18, 2026 | 08:23 AM
Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवकांशी संवाद 
मुख्यमंत्री फडणवीसांचा स्वपक्षीय नगरसेवकांना कडक इशारा
पुण्यात भाजपने इतिहास रचला

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करतानाच त्यांना पारदर्शक कारभाराचा कडक डोस दिला आहे. “महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा किंवा व्यवसाय नाही, तर ते सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे माध्यम आहे,” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नगरसेवकांना सुनावले.

पुण्यात भाजपने इतिहास रचला !
पुणे महापालिकेच्या गेल्या ३०-३५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला इतके प्रचंड बहुमत मिळाले नव्हते. या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मीडियामध्ये चुरशीची लढत दाखवली जात होती, पण आपल्या कार्यकर्त्यांनी ही लढत एकतर्फी केली. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आहे.”

विजयाने हुरळून न जाता, जनतेच्या विकासासाठी जबाबदारीने अविरत काम करावे. (कौल पुण्याचा | पुणे | 17-1-2026)#Maharashtra #Pune #Election pic.twitter.com/3EshETTkxy — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2026

पदांसाठी आपापसांतील चढाओढ टाळा!
महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर पदांच्या वाटपावरून पक्षात कोणतीही गटबाजी किंवा नाराजी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कुणाला यावर्षी संधी मिळेल तर कुणाला पुढच्या वर्षी, मात्र पुणेकरांनी दिलेला विश्वास महत्त्वाचा आहे. जर आपण पदांच्या वादात अडकलो तर जनता आपल्याला माफ करणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचार आणि अती उन्माद खपवून घेणार नाही !
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पारदर्शकतेवर विशेष भर दिला.
“आनंदाच्या क्षणीच कडवट बोललेले बरे असते. महापालिकेत कोणताही उन्माद किंवा पारदर्शकतेचा अभाव मी सहन करणार नाही. कोणी कितीही मोठा असला तरी जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठा नाही. जर आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, तर आपल्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.” असेही ते म्हणाले !

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

पुणेकरांना दिलेली आश्वासने येत्या दोन वर्षात पूर्णत्वास गेलेली दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार पुणे महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून देशाला अभिमान वाटेल अशी ‘नंबर १’ ची महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व स्थानिक नेत्यांना केले आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ यांच्यासह पुण्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Cm devendra fadnavis warn to all corporators to work pmc election 2026 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
3

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
4

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.