Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fadnavis On Ajit Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांचा अजितदादांना मिश्किल टोला; म्हणाले, “तुम्ही जरूर एक दिवस…”

निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 19, 2024 | 05:38 PM
Fadnavis On Ajit Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांचा अजितदादांना मिश्किल टोला; म्हणाले, "तुम्ही जरूर एक दिवस..."

Fadnavis On Ajit Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांचा अजितदादांना मिश्किल टोला; म्हणाले, "तुम्ही जरूर एक दिवस..."

Follow Us
Follow Us:

राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार हे सातत्याने उपमुख्यमंत्रीम्हणून शपथ घेत असल्याने त्यांचा उल्लेख पर्मनंट उपमुख्यमंत्री असा केला जात आहे. सोशल मिडिया किंवा अन्य ठिकाणी आशा कमेंट केल्या जात आहेत. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या कमेंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

गेले अनेक दिवस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना पर्मनंट उपमुख्यमंत्री या कमेंटद्वारे किंवा याद्वारे लक्ष्य केले जात आहे. विरोधक त्यांना टोला लगावत आहेत. यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार तुम्हाला लोक आणि विरोधक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा.” देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत असे भाष्य केले.

मोकळ्या मनाने जनादेश स्वीकारावा – फडणवीस

निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते. मात्र तिथे सिद्ध करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष गेला नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. आम्ही तो लोकसभेत स्वीकारला, त्यावर काम केले.  आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटीव्हमुळे आम्ही हरलो.

हेही वाचा: Devendra Fadnavis: “धूल चेहरे पे थी, आइना साफ़…”; फडणवीसांचा ‘मविआ’ला जोरदार चिमटा

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोवर तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील.” यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरोशायरी करत विरोधकाना टोला लगावला आहे.

‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आइना साफ़ करता रहा’,अशा ओळी विधानसभेत ऐकवत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.  जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा साफ करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खोचक टोला लगावला.

नक्षलवादाविरुद्ध लढाई पुकारली – फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपण नक्षलवादाविरुद्ध लढाई पुकारली. नक्षलवादी म्हणतात की आमचा भारताच्या संविधानवर विश्वास नाही. लोकशाहीवर विश्वास नाही. आता देशामध्ये नक्षलवादाविरुद्ध मोठी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे आम नक्षलवादी संपायला लागले. नवीन भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आता तो नक्षलवाद शहरांमध्ये जागा शोधायला लागला आहे.”

Web Title: Cm devendra fadnavis wishes to ajit pawar become a cm at nagpur winter session 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 05:32 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devendra Fadnavis
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.