raj thackeray and eknath shinde
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोघेही आज पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आठवड्यात मनसेचा दीपोत्सव या कार्यक्रमला शिवाजी पार्क येथे एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा हे एकत्र येणार आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या कार्यक्रमात निमित्ताने राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार आहेत. दरम्यान, आगामी पालिका निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांमध्ये भाजपा, शिंदे गट व मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा आहे.
[read_also content=”अटीतटीच्या सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ५ धावांनी रोमहर्षक विजय https://www.navarashtra.com/sports/india-beat-bangladesh-by-five-runs-in-the-india-bangladesh-t-twenty-match-341244.html”]
दरम्यान, हे तिघेहे एकत्र येऊन निवडणूक लढल्यास मोठ्या मताधिक्यांनी उमेदवार विजयी होतील, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण मागील काही दिवसांपासून राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील गाठीभेठी वाढल्या आहेत. तसेच राज ठाकरे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं पालिका निवडणुकांचा विचार करता हे यांची युती होण्याची शक्यता आहे. या सर्व धरतीवर आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आज पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या कार्यक्रमात निमित्ताने राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार आहेत.