Prithviraj Chavan
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 16 आमदारांच्या (MLA) अपात्रतेवर आज निकाल (Result) दिला आहे. आता निर्णयाचा चेंडू कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलावला आहे. याचा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील, असं कोर्टानं म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. मात्र, आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना अनेक बाबींवर लक्ष दिले. त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणलं असतं, असे स्पष्टपणे म्हटल्यानंतर अखेर राज्यातील सरकार आता स्थिर झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळे हा सगळा पेचप्रसंग उभा राहिला. हे स्पष्ट झालेलं असताना लोकशाहीसाठी एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा आणि नवीन सरकार आणावं, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे राजीनामा देण्याऐवजी…
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याऐवजी बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर परिस्थिती वेगळी होती.
राज्यपालांची भूमिका बेकादेशीर
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झापलं. राज्यपालांची भूमिका आणि निर्णय बेकादेशीर होती, असं कोर्टानं म्हटलं आहे. तसेच यावेळी कोर्टानं राज्यापालांवर ताशेरे ओढले आहेत.