Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate: राजीनामा नाहीच? ऑनलाईन रमी खेळल्याने मिळणार ‘क्रीडा’ खातं, काय येणार कोकाटेंच्या नशिबी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी भेट घेतली. जे काही घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले नाही पाहिजे, असे अजित पवार म्हणाले असल्याचे घाडगे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2025 | 07:01 PM
Manikrao Kokate: राजीनामा नाहीच? ऑनलाईन रमी खेळल्याने मिळणार 'क्रीडा' खातं, काय येणार कोकाटेंच्या नशिबी?

Manikrao Kokate: राजीनामा नाहीच? ऑनलाईन रमी खेळल्याने मिळणार 'क्रीडा' खातं, काय येणार कोकाटेंच्या नशिबी?

Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्याचे विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी नाही तर सरकार भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले. त्यावर मुख्यमंत्रीआणि उपमुख्यमंत्र्यानी नाराजी व्यक्त केली. मात्र आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांना कदाचित क्रीडा खाते मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडल्याचे म्हटले जात आहे. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता त्यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलले जाऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याकडे असलेले कृषी खाते काढून घेऊन ते दत्तात्रय भरणे यांना दिले जाऊ शकते. तसेच भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा खाते कोकाटे यांना दिले जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कोकाटे चांगलेच वादात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांचा क्लास घेत चांगलीच तंबी दिल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या मागणीनंतर व समोर आलेला व्हिडीओ, वादग्रस्त विधाने अशा सर्व गोष्टीनंतर देखील माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा न घेतल्यास खात्यात फेरबदल केले जाऊ शकतात. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे क्रीडा खाते माणिकराव कोकाटेंना आणि कोकाटे यांचे कृषी खाते भरणे यांना दिले जाऊ शकते. त्यामुळे फक्त खातेबदल करून ऑनलाइन रमी व्हिडीओ प्रकरणावर राज्य सरकार पांघरूण घालत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Manikrao Kokate: “आम्हाला का मारलं? कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास…”; विजय घाडगेंचा अजित पवारांना थेट इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी भेट घेतली. जे काही घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले नाही पाहिजे, असे अजित पवार म्हणाले असल्याचे घाडगे म्हणाले. दरम्यान अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.

विजय घाडगेंचा अजित पवारांना थेट इशारा

माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावे. त्यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. आम्ही  अजित पवारांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे. आम्हाला का मारहाण केली? आमचे काय चुकले? असा प्रश्न अजित पवारांना आम्ही विचारले. त्यावर घडलेला प्रकार चुकीचा असून, त्या व्यक्तीला पुन्हा पक्षात घेणार नाही असे पवारांनी सांगितले असल्याचे विजय घाडगे म्हणाले.

Web Title: Cm fadnavis and dcm ajit pawar change manikrao kokate ministry agro to sports online rummy viral video political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devendra Fadnavis
  • Manikarao kokate

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
2

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
3

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
4

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.