उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी भेट घेतली. जे काही घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले नाही पाहिजे, असे अजित पवार म्हणाले असल्याचे घाडगे म्हणाले.
विधानसभेत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला. यामुळे कोकाटेंना चांगलेच धारेवर धरण्यात आले असून मोखाड्यात निषेध म्हणून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
माणिकराव कोकाटे धुळे दौऱ्यावर असताना विरोधी पक्ष चांगलाच तापलेला दिसून येत आहे. माणिकराव हॉटेल टॉपलाईनवर दाखल झाले असता शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते काळ्या झेंड्यासह तेथे आक्रमक रूपात दाखल झाले होते.
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या आधी देखील काही विधानांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
Maharashtra Politics: सभागृहामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच गदारोळ निर्माण झाला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून वाद पेटले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
राज्यातील पीक विमा योजनेत आतापर्यंत 50 टक्के ट्रिगर हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते. उर्वरित ट्रिगर्स एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यंत्रणांद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते.
राष्ट्रवादीचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असल्यामुळे पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. त्यांना अजित पवार यांनी समज दिली आहे.
सातत्याने वादग्रस्त विधाने करणे, शिस्तभंगाचे वर्तन आणि पक्ष कार्यालयातील जनता दरबारास गैरहजर राहणे, अशी अनेक कारणांसाठी अजित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली.