Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार”; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 02:35 AM
“… प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार”; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
Follow Us
Follow Us:

उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार
प्रकल्पासाठी सुमारे ₹५,७६० कोटींची गुंतवणूक
रायगड जिल्ह्यातील महाड येथे प्रकल्प उभारला जाणार

मुंबई: राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्प (पीएसपी) माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलऊर्जा क्षेत्रातील १२०० मेगावॅट वीज निर्मितीसाठी जलसंपदा विभाग व नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड समवेत सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,  जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, जलसंपदा (लाभक्षेत्र विकास) सचिव संजय बेलसरे, नोव्हॅरियन एनर्जीचे अरुण लखानी, सारंग लखानी तसेच  जलसंपदा व ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वानखेडे स्टेडियमवर दिग्गज क्रिकेटपटूंचा सन्मान; CM फडणवीसांच्या हस्ते Ravi Shastri स्टँडचे लोकार्पण

विविध करारांद्वारे राज्यात एकूण 78218 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार असून यासाठी 4 लक्ष 22 हजार 461 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1 लाख 27 हजार  रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. विशेषतः अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.

राज्य शासनाने आत्तापर्यंत ऊर्जा निर्मितीसाठी विविध कंपन्यांसोबत ऊर्जा क्षेत्रात 55 सामंजस्य केले आहेत. या करारांमध्ये टाटा पॉवर कंपनी,  नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, अदानी ग्रीन एनर्जी, टोरेंट पॉवर लिमिटेड  यासह विविध उद्योग समूहांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये 

उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार

या प्रकल्पद्वारे १२०० मेगावॅट वीज निर्मिती; या प्रकल्पासाठी सुमारे ₹५,७६० कोटींची गुंतवणूक; यामधून सुमारे १,५०० रोजगारनिर्मिती

या  कराराअंतर्गत नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी ता. महाड जि. रायगड येथे प्रकल्प  उभारणी होणार

Web Title: Cm fadnavis said maharashtra set to emerge leader in energy generation pumped storage hydroelectric projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • electricity
  • Mahad
  • water news

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.