
Cockroach Janata Party
CJP Maharashtra Protest: कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरच्या मैदानात आंदोलन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चळवळीला अवघ्या १५ दिवसांत देशभरातील तरुणाईचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके ६जूनच्या सकाळी अमेरिकेतून मायदेशी दाखल झाले. विमानतळावरच त्यांना दिल्ली पोलिसांची परवानगी मिळाली. त्यानंतर ते थेट जंतरमंतर या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. दिल्लीत झालेल्या आंदोलनावेळीच त्यांनी देशातील अनेक भागांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. (Cockroach Janata Party Pune protest 2026)
नीट, सीबीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी शनिवारी दिल्लीत पहिले आंदोलन झाले. दिल्लीच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीने दुसऱ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. अभिजीत दिपके यांनी विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात दुसऱ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
भेटूया पुण्यात! जय महाराष्ट्र! https://t.co/3L3IUarDUF — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 8, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे दुसरे आंदोलन येत्या बुधवारी (११ जून) रोजी दुपारी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. या आंदोलनातही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार असून राज्य सरकारसह केंद्र सरकारचे पुन्हा लक्ष वेधले जाणार आहे. अभिजीत दिपके यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. “भेटूया पुण्यात! जय महाराष्ट्र”, असे म्हणत पार्टीच्या सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात झुरळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतील. पुण्यातील किती झुरळे यात सहभागी होतील?” असा सवालही अभिजीत दिपकेंनी या ट्विटमध्ये विचारला आहे. अभिजीत दीपके हे मुळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. दिल्लीच्या आंदोलनात देशातील कानाकोपऱ्यातून त्यांच्या आंदोलनाला तरुणांनी उपस्थित लावली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील त्यांच्या पहिल्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील आंदोलनाला ६ ते ७ हजार तरुण उपस्थित असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले होते.
Cockroach Janata Party: सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चं वादळ
दिल्लीतील आंदोलनासाठी अभिजीत दिपके विमानतळावरच स्थानिक पोलिसांकडून परवानगी मिळाली होती. आता पुण्यातील स्थानिक पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी मिळणार की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.