Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेचे खास गिफ्ट, पुण्यातून धावणार ‘ही’ नवीन एक्स्प्रेस ट्रेन : पहा वेळापत्रक

हडपसर–जोधपूर एक्सप्रेस ही गाडी नियमित सुरू होणार आहे. या गाडीचे हडपसर येथून संध्याकाळी ७.१५ वाजता प्रस्थान होणार आहे. तर जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता पोहचणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2025 | 01:03 PM
हल्ल्यांनंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर

हल्ल्यांनंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, या अंतर्गत चार नवीन फलाटांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच जागतिक दर्जाची डिजिटल यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर–जोधपूर एक्सप्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि मेधा कुलकर्णी उपस्थित होते. तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन (चेन्नईहून) आणि गजेंद्रसिंह शेखावत (जोधपूरहून) दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

वैष्णव यांनी सांगितले की, पुणे, हडपसर, खडकी, शिवाजीनगर, उरळी कांचन आणि आळंदी या सहा स्थानकांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. पुणे–नागपूर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पुणे–नाशिक मार्गावर देखील नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू असून, खोडद येथील जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेमुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे. पुणे–लोणावळा मार्गावर तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हडपसर–जोधपूर एक्सप्रेसमुळे पुण्यातील राजस्थानी समुदायाला मोठा लाभ होणार आहे. राज्यात रेल्वे विभागाची एक कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत पुणे, हडपसर, उरळी आणि शिवाजीनगर स्थानकांचा विकास सुरू आहे. दरम्यान यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी कुंभमेळा लक्षात घेता पुणे–नाशिक दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.

उद्यापासून (५ मे) हडपसर–जोधपूर एक्सप्रेस ही गाडी नियमित सुरू होणार आहे. या गाडीचे हडपसर येथून संध्याकाळी ७.१५ वाजता प्रस्थान होणार आहे. तर जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता पोहचणार आहे. तसेच जोधपूर येथून रात्री १० वाजता प्रस्थान व दुसऱ्या दिवशी हडपसर येथे संध्याकाळी ५ वाजता आगमन होणार आहे. सदर एक्स्प्रेस चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, आबू रोड, पिण्डवाडा, जवाई बाँध, फालना, राणी, मारवाड जंक्शन, पाली मारवाड, लूनी या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.

Web Title: Commencement of hadapsar jodhpur express train brings relief to passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • narendra modi
  • pune news
  • rajstan
  • Special Train

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
3

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
4

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.