Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी

व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना ८ जुलैपासून देण्यात आली आहे. या सूचनेची अंमलबजावणी १६ ऑगस्ट २०२६ केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 11:30 AM
व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी

व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, २, ७८ आणि ८५ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना ८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, १६ ऑगस्ट २०२६ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. याबतचे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात दिले. महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची आणि समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Maharashtra Monsoon Updates: पुराच्या पाण्यामुळे कल्याण-डोंबिवलीची जलवाहिनी फुटली; नागरिकांवर पावसाचे पाणी उकळून पिण्याची वेळ

रोजगारासाठी देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचे महाराष्ट्राने नेहमीच स्वागत केले आहे. मात्र राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी आहे. 66 महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, मात्र महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे. मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या, संस्कृतीचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सार्वजनिक सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न

मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे, या भावनेतून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा सक्षम करण्यासाठी आहे.चालक-प्रवासी संवाद स्पष्ट झाल्यास गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतुकीवरील नागरिकांचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राबविली आहे राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षण मोहीम राबवली आहे.कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली आहे.

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

वाहन चालकांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार वर्ग घेतले जात आहेत. दैनंदिन वापरातील वाक्ये, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा, भाडे, आपत्कालीन प्रसंग तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांशी संवाद यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सोप्या पुस्तिका, संवादमाला आणि प्रशिक्षण साहित्याद्वारे मराठी शिकणे सोपे केले जाणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Commercial drivers in maharashtra to be required to know marathi from august 16 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
1

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
2

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
3

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू
4

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.