Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनाची समस्या गेल्या दीड दशकापासून सुटलेली नाही. या पदाची निर्मिती होऊन १५ वर्षे उलटली तरी मानधनाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 02:55 PM
26 हजार शिक्षकांना जुनी पेन्शन नाकारली; दोनदा घोषणा होऊनही न्याय नाही, राज्यभर मोर्चातून एल्गार

26 हजार शिक्षकांना जुनी पेन्शन नाकारली; दोनदा घोषणा होऊनही न्याय नाही, राज्यभर मोर्चातून एल्गार

Follow Us
Follow Us:

गुहागर : गेल्या पाच महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने संतापलेले राज्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगणक परिचालक आपल्या हक्कासाठी येत्या २४ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत. अत्यल्प मानधन आणि त्यातही होणारा विलंब यामुळे परिचालकांचे जगणे कठीण झाले असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे ‘एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन’ करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनाची समस्या गेल्या दीड दशकापासून सुटलेली नाही. या पदाची निर्मिती होऊन १५ वर्षे उलटली तरी मानधनाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. तुटपुंजे मानधन आणि ते मिळण्यासाठी महिनोंमहिने करावी लागणारी प्रतीक्षा, या चक्रात परिचालक अडकले आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही केवळ तात्पुरत्या आश्वासनांवरच त्यांची बोळवण केली जात आहे.

दरम्यान, येत्या २४ तारखेला मुंबईत होणाऱ्या या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य परिचालक सहभागी होणार आहेत. ‘आता केवळ आश्वासन नको, तर ठोस तोडगा हवा,’ अशी भूमिका परिचालकांनी घेतली आहे.

पाच महिन्यांचे मानधन रखडले

सध्या ऑक्टोबर महिन्यापासूनचे मानधन थकीत आहे. चालू महिना धरता आता तब्बल पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने परिचालकांचे कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावर मानधन मिळाले होते. मात्र, त्यानंतर मानधनाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. कोकणात शिमगोत्सव मोठा असतो; मात्र सण तोंडावर असूनही खिशात पैसे नसल्याने परिचालकांमध्ये तीव्र चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.

अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर

दुसरीकडे, अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या गंभीर बनली असून उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढत चालली आहे. मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २४० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, तर गाळेधारकांकडून सुमारे ३० कोटी रुपये येणे बाकी आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने महापालिकेला दरमहा मोठ्या आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.

हेदेखील वाचा : Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Web Title: Computer operator aggressive for outstanding honorarium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Agitation News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
2

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
3

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…
4

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.