
Confusion as two dates announced for interview of BJP aspirants for Nanded-Waghala Municipal Corporation elections
Maharashtra Politics : नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या उमेदवार मुलाखतींच्या तारखांवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन वेगवेगळी वेळापत्रके जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे. पूर्वी जाहीर झालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील इच्छुकांची मुलाखत रविवार, ७ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार होती. अनेक इच्छुकांनी त्यानुसार तयारी करून बैठकीची वाट पाहत होते.
मात्र दुपारीच भाजपा महानगरपालिका निवडणूक प्रभारी खासदार डॉ. अजित गोपछडे याच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. त्यामध्ये भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १३ व २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत अंत्योदय जनसंपर्क कार्यालय, विद्युत नगर चौक येथे प्रत्यक्षरित्या होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या विरोधाभासी घोषणांमुळे उमेदवार चकित झाले आहेत.
नेमकी मुलाखत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली का?
१३-१४ डिसेंबरला प्रत्यक्ष उपस्थित राहायचे का? या संदर्भात अधिकृत स्पष्टता न मिळाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : शिवसेना पुन्हा फुटणार? मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले 22 आमदार, ठाकरेंचा मोठा दावा
राजकीय चर्चेचा विषय
महापालिका निवडणुका जवळ येत असताना भाजपाच्या मुलाखतीच्या तारखांतील हा गोंधळ सध्या नांदेडच्या राजकीय चर्चेचा विषय ठरत असून, पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय स्पष्ट झाल्यानंतरच उमेदवार निवड प्रक्रियेतील पुढील टप्पे सुरळीत पार पडतील, असे निरीक्षकांचे मत आहे.
पक्षांतर्गत नाराजी
भाजपाच्या निवडणूक प्रक्रियेतल्या या समन्वय अभावामुळे पक्षांतर्गत नाराजीही व्यक्त होत आहे. अचानक दोन वेगळ्या तारखांची माहिती इच्छुकांच्या नियोजनावर, कागदपत्रांच्या तयारीवर परिणाम झाल्याचे अनेकांनी सांगितले, तसेच पक्ष नेतृत्वाने तातडीने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही वाढली आहे.
हे देखील वाचा : भास्कर जाधव ठरले ‘ऑपरेशन टायगर’चे शिकार? विरोधी पक्षनेते न मिळताच घेतली शिंदेंच्या नेत्याची हॉटेलमध्ये भेट
उमरीचा गड गोरठेकर बंधूच राखणार !
उमरी नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून सट्टेबाजार बहरलय असून गोरठेकर गटाची नगरपालिकेवर सत्ता येईल, असा ठाम विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात असून सट्टेबाजारात गोरठेकर गटालाच जास्त भाव मिळत असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. निकालासाठी पैज लावण्याची स्पर्धा सध्या उमरी शहरात सुरु झाली आहे. उमरी नगरपालिकेवर आत्तापर्यंत गोरठेकर गटाने वर्चस्व गाजविले असून बंदा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप मध्ये दुरंगी लढत इवली आहे. शिरीष गोरलेकर व कैलास गोरठेकर या बंधूनी प्रचाराची नियोजनबध्द मंत्रणा हाताळली होती. नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर गोरठेकर गटाचे
उमेदवार विजयी होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकत्यांनी केला आहे. उमरी शहराच्या विकासात गोरठेकर परिवाराचे मोठे योगदान राहिले आहे. के. माजी. आ. बापूसाहेब गोरठेकर यांनी उमरी सहरासाठी भरीव निधी वेळोवेळी आणला होता. गोरठेकर न्यांच्या पक्षात पहिल्यांदाच त्यांचे सुपुत्र शिरीष गोरठेकर व कैलास गोरठेकर यांनी निवडणुकीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.