congress and rohit pawar support Atharva Sudame controversial reels on hindu muslim
Atharva Sudame controversial reel : पुणे : लोकप्रिय रिलस्टार अथर्व सुदामे हा जोरदार चर्चेत आला आहे. अथर्व सुदामे हा नेहमी महाराष्ट्राची संस्कृती आणि सणांवर रिल्स तयार करत असतो. त्याचबरोबर समाजील अनेक सामाजिक संवेदनशील विषयांवर देखील अथर्वने रिल्स काढले आहेत. यावेळी अथर्वने गणेशोत्सावाच्या निमित्ताने हिंदू मुस्लीम ऐक्यावर व्हिडिओ तयार केली होती. यामध्ये मुस्लीम गणेश मूर्ती कलाकाराकडून मूर्ती खरेदी करण्याबाबत आशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र टीकेनंतर अथर्वने तो रिल डिलीट केला. यानंतर मात्र राजकीय नेत्यांनी अथर्वची बाजू सावरुन घेतली आहे.
आपल्या रिल्समधून हसवणाऱ्या अथर्व सुदामेने यावेळी गणेशोत्सावाच्या निमित्ताने व्हिडिओ शेअर केली होती. यामध्ये त्याने हिंदू मुस्लीम ऐक्याचा विषय हाताळत व्हिडिओ तयार केली होता. मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्याने हा व्हिडीओ डिलिट केला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अथर्वने व्हिडिओ जारी करत माफीही मागितली आहे. अथर्व सुदामे याने या प्रकरणी माफी मागितली असली तरी काही लोकांनी त्याला पाठिंबादेखील दिला आहे. राजकीय नेत्यांनी त्याची रिल शेअर करत पाठिंबा दर्शवला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी रिलस्टार अथर्व सुदामेची डिलीट केलेली व्हिडिओ शेअर केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केली आहे. यावेळी रोहित पवार यांनी लिहिले आहे की, आपल्या सर्वच संतांनी दिलेली बंधुता आणि सामाजिक एकात्मतेची शिकवण अथर्व सुदामे याच्या या रिलमधून बघायला मिळते. मला अत्यंत आवडलेलं हे रिल मी शेअर करतोय…असे लिहित रोहित पवार यांनी सुदामेची पुन्हा व्हिडिओ शेअर केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर महाराष्ट्र कॉंग्रेसकडून देखील अथर्व सुदामेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन रिल शेअर करण्यात आली आहे. कॉंग्रेसने लिहिले आहे की, धर्माच राजकारण करणाऱ्या भाजपने अर्थव सुदामे या तरुणाकडून काहीतरी शिकावे. मनातील भक्तिभाव आणि माणुसकी महत्वाची असते परंतु भाजप स्वार्थी राजकारणासाठी करत असलेल्या धर्माच्या राजकारणाला या तरुणाने चपराक दिली आहे. अथर्व सुदामेला जबरदस्ती करून, दबाव टाकून जरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर डिलिट करायला लावला असेल तरी काँग्रेस अथर्व सारख्या तरुण मुलांच्या पाठीशी सद्दैव उभी आहे, असे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
धर्माच राजकारण करणाऱ्या भाजप ने अर्थव सुदामे या तरुणाकडून काहीतरी शिकावे.
मनातील भक्तिभाव आणि माणुसकी महत्वाची असते परंतु भाजप स्वार्थी राजकारणासाठी करत असलेल्या धर्माच्या राजकारणाला या तरुणाने चपराक दिली आहे.
अथर्व सुदामेला जबरदस्ती करून, दबाव टाकून जरी हा व्हिडिओ सोशल… pic.twitter.com/jHWAAj3J0C— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 26, 2025