मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. लाखो समर्थकांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येत आंदोलन करणार आहेत. ऐन गणपतीमध्ये त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई हाय कोर्टाने ब्रेक लावला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
manoj jarange patil mumbai morcha for maratha reservation
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा जरांगे पाटील यांचा मानस आहे. मात्र याला हाय कोर्टाने नकार दिला आहे.
मुंबईत आल्यावर मला गोळ्या झाला....; मोर्चापूर्वी जरांगेंचा आंतरवली सराटीतून एल्गार
मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे चंद्रकांत पाटील स्पष्टपणे म्हणाले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
त्यानंतर शेवगाव, मिरी मका, पांढरीपुल, अहिल्यानगर बायपास मार्गे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येणार आहे. त्यानंतर नेप्ती चौक आणि आळेफाटा मार्गे पुढे जाणार आहे.
27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुक्काम हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नरमधील शिवनेरीमध्ये असणार आहे.
28 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत आणि दर्शन घेत जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पुढे मार्गस्थ होणार आहेत.
त्यानंतर राजगुरुनगर खेड मार्गे चाकण, तळेगाव, लोणावळा पार करत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे आगेकूच करणार आहे.
29 ऑगस्ट रोजी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण देण्याच्या मुख्य मागणीसह जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत.