Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा; महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवू; सपकाळांचा विश्वास

नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिकातही काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2026 | 05:39 PM
भाजपच्या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा; महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवू; सपकाळांचा विश्वास

भाजपच्या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा; महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवू; सपकाळांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा
  • महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवू
  • हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने पैसा, पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर संस्कृती, संकेत व परंपरा पायदळी तुडवत लोकशाहीचा तमाशा चालवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी असून ते विरोधी पक्षांवर बुलडोझर चालवत आहेत पण या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला म्हणूनच नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष व १००६ नगसेवक विजयी झाले. नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिकातही काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिका प्रचारासाठी सोलापुर दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते पुढे म्हणाले की, स्थानिकच्या निवडणुकीत राज्यात तीन खून झाले आहेत, हे असुरी राजकारणाचे भयावह चित्र आहे. भारतीय जनता पक्ष कोयता गँग, वरळी मटका, ड्रग्ज माफिया यांना उमेदवारी देत आहे. तुळजापूरमध्ये भाजपाने ड्रग्ज माफियाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. गुन्हेगारच नाही तर बलात्काऱ्यांनाही भाजपा संरक्षण देत आहे. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत शहरातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे पण सत्ताधारी पक्ष मात्र मराठी, हिंदी, उर्दू भाषा व महापौर कोण पाहिजे, मराठी की परप्रांतीय, यावर चर्चा केली जात आहे. सत्ताधारी पक्षाने बिनविरोधचा चालवलेला सपाटा अत्यंत चुकीचा आहे, या बिनविरोधच्या ठिकाणी नोटाचा पार्याय ठेवा व लोकशाही वाचवा, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी अदानीच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे ती रास्तच आहे. काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या विरोधात नाही पण मोदी सरकार ज्या पद्धतीने देशातील सर्वच क्षेत्रात अदानीला मुक्तहस्ते संचार करु देत आहे, ते देशासाठी अत्यंत घातक आहे. राहुल गांधी जे सांगत आहेत तेच काल शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय संत अदानीसाठी भाजपा पखालीने पाणी घालत आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता आली तर ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटीश सरकारने जशी ताब्यात घेतली तसे अदानी व अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करू, असे सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वंचितबरोबर काँग्रेसची मुंबई, लातूर व नांदेडमध्ये आघाडी आहे, ही आघाडी केवळ राजकीय नाही तर विचारांचा मेळ आहे. ती पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, मित्रपक्षाने नाहक, अनावश्यक विधाने टाळायली हवीत. खासदार प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षात आहेत व राहतील असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized bjp and gautam adani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Congress
  • Election News
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
1

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

ट्रॅफिक प्लॅनिंग, रस्त्यांची सुधारणा अन्…; प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा ‘जनहितनामा’ प्रसिद्ध
2

ट्रॅफिक प्लॅनिंग, रस्त्यांची सुधारणा अन्…; प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा ‘जनहितनामा’ प्रसिद्ध

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु
3

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

Pune Election : धंगेकर धावले राष्ट्रवादीच्या मदतीला; चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ फोटो केला शेअर
4

Pune Election : धंगेकर धावले राष्ट्रवादीच्या मदतीला; चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ फोटो केला शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.