Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Drought News : वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचं सांगत त्यांनी हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 15, 2026 | 04:45 PM
Harshvardhan sapkal visit washim drought

Harshvardhan sapkal visit washim drought

Follow Us
Follow Us:
  • हेक्टरी १ लाख रुपये आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी
  • ७५ दिवसांपासून पावसाची दडी? खरीप पिकांच्या नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर
  • जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची काँग्रेसची मागणी
 

Droght News : राज्यात शेतकरी बांधवाना दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. राज्य सरकारने राज्यातील अनेक भागांत दुष्काळ जाहीर केला असून शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पाहणी करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अश्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांचा अडचणी समजून घेत आहेत.

अश्यातच आज (शुक्रवार, 15 ऑकटोबर) हर्षवर्धन सपकाळ यांनी दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या वाशीम जिल्ह्याला भेट देऊन शिवाराची पाहणी केली. याबाबत त्यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्याना भरीव मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत त्यांनी हि माहिती दिली.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

ते म्हणाले, “पांडव उमरा, तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला… डोळ्यांत अश्रू, समोर वाळत चाललेली तूर, चाऱ्याची टंचाई, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर! पोटच्या लेकरासारखं जपलेलं पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची ही व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे.”

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

“मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये ठेवून त्यांच्या वेदना संपणार नाहीत! बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि कर्जाचा डोंगर यांचा हिशेब या तुटपुंज्या मदतीत कसा बसणार? बांधावर जाऊन फोटो काढण्यापलीकडे आता ठोस निर्णय घ्या. शेतकऱ्यांना भाषणं नकोत, आश्वासनं नकोत; त्यांना हक्काची मदत हवी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका!”

“साहेब, ५ हजार रुपयांत काय होणार? शेतकऱ्याचं दुःख एकदा बांधावर येऊन समजून घ्या!” पांडव उमरा, तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला… डोळ्यांत अश्रू, समोर वाळत चाललेली तूर, चाऱ्याची टंचाई, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर! पोटच्या लेकरासारखं जपलेलं पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची ही व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये ठेवून त्यांच्या वेदना संपणार नाहीत! बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि कर्जाचा डोंगर यांचा हिशेब या तुटपुंज्या मदतीत कसा बसणार? बांधावर जाऊन फोटो काढण्यापलीकडे आता ठोस निर्णय घ्या. शेतकऱ्यांना भाषणं नकोत, आश्वासनं नकोत; त्यांना हक्काची मदत हवी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका! — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) October 15, 2026

“शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्याची जबाबदारी सरकारची”

ते पुढे म्हणाले, “वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शिवारात थेट बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता अनुभवली. ७५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकं करपली, उत्पादन घटलं आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा संकटात शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे.”

“मात्र, दिवाळी गोड करण्याच्या घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने ५ हजार रुपयांची तुटपुंजी अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही मदत आहे की शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“घोषणांची मलमपट्टी नको, नुकसानभरपाई हवी”

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना घोषणांची मलमपट्टी नको, त्यांच्या नुकसानीची भरपाई हवी! हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा. सर्वेक्षण आणि बैठकांचे सत्र थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा. शेतकऱ्यांच्या संकटाची थट्टा खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील..!”

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शिवारात थेट बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता अनुभवली. ७५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकं करपली, उत्पादन घटलं आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा संकटात शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, दिवाळी गोड करण्याच्या घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने ५ हजार रुपयांची तुटपुंजी अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही मदत आहे की शेतकऱ्यांची क्रूर थट्टा? शेतकऱ्यांना घोषणांची मलमपट्टी नको, त्यांच्या नुकसानीची भरपाई हवी! हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा. सर्वेक्षण आणि बैठकांचे सत्र थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा. शेतकऱ्यांच्या संकटाची थट्टा खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील..! यावेळी आमदार अमित झनक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, प्रदेश सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) October 15, 2026

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाशीम दौऱ्यातयावेळी आमदार अमित झनक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, प्रदेश सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिममध्ये कोणत्या भागांची पाहणी केली?

    Ans: हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिम जिल्ह्यातील पांडव उमरा, तांदळी आणि मालेगाव शिवारातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या मागण्या केल्या?

    Ans: त्यांनी हेक्टरी एक लाख रुपये सरसकट मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली.

  • Que: पाच हजार रुपयांच्या मदतीवर सपकाळ यांनी काय म्हटलं?

    Ans: पाच हजार रुपयांची अग्रीम मदत बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि कर्जाचा भार पेलण्यासाठी अपुरी असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं.

Web Title: Droght news harshwardhan sapkal washim drought farmers 1 lakh aid demand vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • drought news
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका
1

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट
2

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा
3

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
4

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.