Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले, म्हणूनच ते…; हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?

मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2025 | 06:01 PM
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले, म्हणूनच ते...; हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?

मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले, म्हणूनच ते...; हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:
  • हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर निशाणा
  • पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणीही मांडली भुमिका
  • निवडणूक आयोगावरही सपकाळांचे आरोप

मुंबई : देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोटाळे करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला अनुकूल नावे समाविष्ट करणे व विरोधांना अनुकुल असलेल्यांची नावे वगळणे, एकाच घरात ८० किंवा १०० मतदार, घर नंबर नसलेल्यांची नावे, वयांमध्ये फेरफार असे अनेक प्रकारचे गोंधळ या यादीत आहेत. मतदारांची वाढलेली संख्या ही सुद्धा अनाकलनीय आहे. याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केलेले असताना निवडणूक आयोगाकडून जी उत्तरे दिली जात आहेत ती समाधानकारक नाहीत व पटणारीही नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कठपुतली बाहुल्यासारखी आहे. निवडणूक आयोगाचा कारभार पहाता त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्याची तयारी केली जात आहे आणि तसा निर्णय झाला तर काँग्रेस पक्ष त्याचे समर्थन करेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या, हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असे सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized bjp leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

अधिकारी अन् कर्मचारी करतात तरी काय? कामचुकार करणाऱ्यांना घरी बसविणार; आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा
1

अधिकारी अन् कर्मचारी करतात तरी काय? कामचुकार करणाऱ्यांना घरी बसविणार; आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा

सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम ‘या’ तारखेपासून होणार सुरु
2

सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम ‘या’ तारखेपासून होणार सुरु

क्रेन बाजूला घेण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
3

क्रेन बाजूला घेण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पुणे महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन माेडवर, सहायक आयुक्तांंची तातडीने केली बदली; नेमकं कारण काय?
4

पुणे महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन माेडवर, सहायक आयुक्तांंची तातडीने केली बदली; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.