Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात

सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2025 | 06:12 PM
सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात

सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात

Follow Us
Close
Follow Us:
  • सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर
  • ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र
  • हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचा महापूर आणून उडता महाराष्ट्र बनविण्याचा घृणास्पद प्रकार सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावातील घरापासून हाकेच्या अंतरावर अंमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना सुरु होता. या प्रकरणात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आरोपीला सोडून दिले. काही बंगाली आणि बांग्लादेशी कामगारांना अटक करून मुख्य सुत्रधाराला सोडून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

सपकाळ यांचे सत्ताधाऱ्यांना खालीलप्रमाणे सवाल

पश्चिम बंगाल व बांग्लादेशचे कामगार इतक्या दुर्गम ठिकाणी कोणाच्या मदतीने वास्तव्यास थांबले?

ज्या ठिकाणी ड्रग्स निर्मिती सुरु होती त्या इमारतीच्या मालकाकडून ओंकार दिघे याने एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या कामासाठी जागा वापरण्यास मागितली होती, हे स्पष्ट झाल्यावर ओंकार दिघे याला ड्रग्स निर्मिती स्थळावरच ताब्यात घेण्यात आले होते, परंतु त्याला कोणाच्या दबावामुळे सोडण्यात आले?

ओंकार दिघे हा सावळी गावात कधीपासून वास्तव्यास आहे?, कोणामुळे तो इकडे आला?

इतर जवळपास ४० कामगार या कामगारांसोबत काम करत होते त्यांच्याबाबत काय झालं ? त्यांना पळून जाण्यात कुणी मदत केली? पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली त्यांना सोडून दिले.

ज्याला एक दिवस आधी २ किलो MD ड्रग्स सह अटक केली तो विशाल मोरे अजित पवार गटाचा पुण्यातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे, त्याचे ओंकार दिघे आणि प्रकाश शिंदे यांच्याशी काय संबंध आहेत?

प्रकाश शिंदे कारवाईच्या आदल्या रात्रीपर्यंत तेजस हॉटेलवर होते, रात्री विशाल शिंदे याला अटक झाल्यावर ते हॉटेलवरून कसे निघून गेले? त्यांना तिथून पळून जाण्यास कोणी मदत दिली.

पोलिसांनी तेजस हॉटेलची झाडाझडती का घेतली नाही पंचनामा केला की नाही? महाराष्ट्राला ड्रग्स च्या विळख्यात लोटणाऱ्या या गंभीर घटनेवर गृहमंत्री अजून गप्प का आहेत?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिथे जाऊन धाड घालेपर्यंत सातारा पोलिसांना यांची कल्पना नव्हती का? त्यांच्या आशिर्वादानेच हा कारखाना सुरु होता? की उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक हा कारखाना चालवत असल्याने कारवाई होतं नव्हती? जिथे साधा रस्ता नाही अशा दुर्गम भागात हे हॉटेल आणि ड्रग्सचा कारखाना एकाचवेळी सुरु झाले. कारखान्यात काम करणाऱ्यांचे जेवणही याच हॉटेलमधून जात होते. या हॉटेलचे मालक आणि अंमली पदार्थांचा कारखाना चालवणारे एकच आहेत अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्याच्यावर कारवाई करू नये म्हणून उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातील एका खासदाराने पोलिसांवर दबाव आणला हे खरे आहे का?

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ड्रग्स बनवणे सोपे आहे” असे बेजबाबदार वक्तव्य केले. यावरून तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या विषाचा व्यापार रोखण्याबाबत ते गंभीर नाहीत हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरांविरोधात ओरडणारे सत्ताधारी नेते बांग्लदेशींना आणून ड्रग्सच्या फॅक्टरी चालवत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातल्याचे वक्तव्य राजकीय पटलावर चर्चेत आहे. शाह यांच्या दबावामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक होतं नाही का? याचा खुलासाही सरकारने करावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

निवडणूक आयोगावर सपकाळांचा निशाणा

निवडणूक आयोगाने आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली असली तरी निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेबाबत आम्ही महत्त्वाचे पुराव्यासह, आक्षेप आणि हरकती नोंदवल्या होत्या. त्यावर आयोगाने काहीच कारवाई केली नाही. सत्ताधारी पक्षाचा पुण्यातील एक कार्यकर्ता उघडपणे वॉर्ड रचना करत असल्याचे समोर येऊनही आयोग गप्प का आहे? हे समजण्यापलीकडचे आहे. राज्यात माहापालिकांच्या निवडणुका होत आहेत पण त्या पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, हे आता स्पष्ट दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the government over the drugs issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
1

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

सासवड पोलीस ठाण्यातील वादग्रस्त कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन; नेमकं कारण काय?
2

सासवड पोलीस ठाण्यातील वादग्रस्त कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन; नेमकं कारण काय?

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट
3

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्…
4

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.