Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर…; काँग्रेसचे आव्हान

राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांना एकमेकांवर आरोपच करायचे असतील तर सत्तेतून बाहेर पडा व मग आरोप करा, असे आव्हान सपकाळ यांनी दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2026 | 12:28 PM
भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर...; काँग्रेसचे आव्हान

भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर...; काँग्रेसचे आव्हान

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपा व राष्ट्रवादीचे एकमेकांवर आरोप
  • हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा
  • हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान
पुणे : राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर पडा व मग आरोप करा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यभर झंझावाती प्रचार सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यात प्रचार सभा घेऊन त्यांनी पुणे व ठाण्यात पदयात्रा व रॅलीमध्ये सहभाग घेतला तसेच प्रचार सभाही घेतल्या. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे असा आरोप अजित पवार करत आहेत तर भाजपा अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर विचारले असता अजित पवार जय जिनेंद्र व जय जैन बोर्डिंग म्हणतात. सरड्यालाही लाजवेल असे रंग हे लोक बदलत आहेत. सत्तेत राहुन एकमेकावर आरोप करण्यापेक्षा अजित पवारांनी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे अन्यथा भाजपाने अजित पवारांच्या पक्षाचा पाठिंबा नाकारावा. पण ते तसे करणार नाहीत. दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपा शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात नैतिकता राहिलेली नाही.

सपकाळ पुढे म्हणाले की, पुणे शहराला मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा व वारसा लाभलेला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख होती पण आता पुण्यात ड्रग्जचा काळा धंदा, कोयता गँग, भ्रष्ट व पायाभुत सुविधांचा बोजवारा उडालेले शहर अशी ओळख बनली आहे. आता पुणेकरांनीच आपला पुणेरी बाणा जपला पाहिजे, असे अवाहन सपकाळ यांनी केले आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष आहे, त्यांना पक्षात कोणीही चालते. गुंड, मवाली यांना तर त्यांनी पक्षात सामावून घेतलेच आहे आता त्यांनी बलात्काऱ्यांनाही पक्षात सामावून घेतले आहे, असे सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the ncp and bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप
1

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी
2

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या…
3

राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या…

ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न
4

ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.