Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या ऑर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये बसवून चौकशी करा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2026 | 05:26 PM
लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई आहे का? सपकाळांचा सवाल
  • बिश्नोईला आर्थर रोडच्या अंडासेलमध्ये टाकण्याची मागणी
  • मुख्यमंत्री फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान
मुंबई : कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालतो. लोकप्रतिनिधी, बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देतो, गोळीबार करतो, हत्या करतो. भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? लॉरेन्स बिन्शोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या ऑर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये बसवून चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. फक्त बॉलिवूडच भितीच्या सावटाखाली जगत नसून संपूर्ण महाराष्ट्र भितीच्या सावटाखाली आहे. सरकारच्या नाकाखाली टिच्चून मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर जिवघेणा हल्ला करण्यात आला. याआधी एका माजी मंत्र्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राज्यात वाढलेली गुन्हेगारी, माफियागिरी, गँगचा सुळसुळाट हे गृहविभागाचे अपयश असून राज्याला देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री लाभलेले आहेत, त्याचा हा परिणाम आहे. राज्याला आतातरी पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

५०० कोटींच्या आरोपाची ED चौकशी करा

मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या देवाण घेवाणीची ऑडीओ क्लिप जाहीर केली आहे. या ऑडिओमध्ये ज्यांची ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, संपूर्ण प्रकरणाची ED चौकशी करून ५०० कोटी रुपये कुठून आले? कोणी आणले? कोणाला दिले? याची चौकशी करा. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतलेले आहे, त्यांना अटक करा, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.

मोदींच्या मंत्र्याचे एपस्टिन कनेक्शन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे जामनगरमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेत असतानाच मोदी सरकारमधील मंत्री हरदिप पुरी यांचा एपस्टिनबरोबरचा फोटो समोर येणे हा काही योगायोग नाही. आपण एपस्टिनला एका शिष्टमंडळासोबत भेटलो होतो, असा दावा हरदीप पुरी यांनी केला होता पण फोटोत तर ती खाजगी भेट दिसत आहे. जगभरातील ज्या देशातील व्यक्तीचे नाव एपस्टिनबरोबर आले त्यांच्या चौकशा सुरु आहेत, राजीनामे घेतले आहेत पण मोदी सरकारमधील मंत्री हरदीप पुरी यांना मात्र वाचवले जात आहे. संसदेत एपस्टिन शब्द उच्चारला तरी माईक बंद केला जातो, बोलू दिले जात नाही. एवढया घाणेरड्या प्रकरणात मोदी सरकारमधील मंत्र्याचे नाव आले असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री परिणय फुकेंचे आरोप बिनबुडाचे

भाजपाचे मंत्री परिणय फुके यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेला आरोप हा बदनामी करण्याचा प्रकार आहे. भाजपा आरएसएसने महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनाही सोडले नाही, त्यांचीही अशीच बदनामी केली. चारित्र्यहनन करणे ही त्यांची विकृती आहे. याच परिणय फुके यांच्या कुटुंबातील एक गंभीर प्रकरण आमच्याकडे आले होते पण तो कौटुंबिक वाद आहे, असे सांगून आम्ही त्याची वाच्यता केली नाही, हा सामंज्यसपणा आम्ही दाखवला. फुकेंनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ‘King Is Back’ स्टेटसवरून वाद , १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; तळेगाव दाभाडेतील घटनेनं खळबळ

राजा उदार झाला, हाती भोपळा दिला

राज्यात भिषण दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी हवालदिल आहे पण भाजपा महायुती सरकारची मदत म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ असा प्रकार आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पडेल का, हा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकार फक्त पोकळ घोषणा करत आहे. तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी १ लाख रुपये जमा करा, सरसकट कर्जमाफी करा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा, पिण्याच्या पाण्याची सोय करा, शेतमजुरांना अनुदान व मोफत १२ गॅस सिलेंडर द्या, जुनी रोजगार हमी योजना लागू करा, मुलांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करा, विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचा पास द्या, अशा मागण्या हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी काय मागणी केली?

    Ans: लॉरेन्स बिश्नोईला साबरमती जेलमधून मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये हलवून चौकशी करण्याची मागणी केली.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सवाल केला?

    Ans: लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई आहे का, असा सवाल करत सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले.

  • Que: लॉरेन्स बिश्नोई सध्या कोणत्या तुरुंगात आहे?

    Ans: सपकाळ यांच्या वक्तव्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded action against lawrence bishnoi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Lawrence Bishnoi

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
1

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी
2

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा
3

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा

CM Devendra Fadnavis : दहा हजार मते इनव्हॅलिड होत असतील तर मतदारांना डिग्री कोणी दिली?
4

CM Devendra Fadnavis : दहा हजार मते इनव्हॅलिड होत असतील तर मतदारांना डिग्री कोणी दिली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.