Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिपमधून 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गटाने आरोप फेटाळत क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 22, 2026 | 03:16 PM
Manoj Jarange on Eknath Shinde

Manoj Jarange on Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • जरांगे पाटलांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
  • शिंदे गटाची फडणवीसांकडे धाव
  • आरोपांची चौकशी करण्याची मागणी
 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आज (गुरुवार, 22 ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत एक खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आले असून श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगेना 500 कोटी रुपये पोहचवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यात सुद्धा हा आरोप केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हा ऑडिओ बॉम्ब फोडला.

जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात राजकीय वातावरणात एकाच खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्याची तयारी शिंदे गट करणार आहे.

नेमका 500 कोटींचा आरोप काय?

मनोज जरांगे पाटील यांनी या कथित ऑडिओ क्लिपच्या संदर्भात भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन ते आपल्यापर्यंत पोहोचवल्याची चर्चा नेमकी कशाच्या आधारावर सुरू झाली, असा सवाल उपस्थित केला. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पैसे दिल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. यावरूनच आक्रमक पवित्रा घेत जरांगेंनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, या आरोपांमागचं सत्य समोर आलं पाहिजे, अशी भूमिका घेतली.

‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, ५०० कोटींचा दावा अन् एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा; Manoj Jarange Audio Clip मध्ये नेमकं काय?

शिंदे गटाची फडणवीसांकडे धाव

या आरोपांनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कथित क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्याची तयारी असल्याचंही सांगितलं जात आहे.

मंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया dयेत, “ऑडिओ क्लिप खरी असेल तर ही गंभीर बाब आहे. क्लिप कोणी व्हायरल केली आणि त्यातील आवाज कोणाचा आहे, याची तपासणी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

नरेश म्हस्के आणि नितेश राणेंची प्रतिक्रिया

खासदार नरेश म्हस्के यांनीही क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. दुसरीकडे, भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगेंच्या आरोपांवर टीका केली. केवळ चर्चा किंवा ऐकीव माहिती म्हणजे पुरावा होत नाही, असे म्हणत त्यांनी जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपवर आक्षेप आहे.

आता चौकशीतून काय समोर येणार?

जरांगे पाटलांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप, प्रत्यारोप आणि चौकशीची मागणी यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता संबंधित क्लिपची सत्यतेबाबत तपासातून काय समोर येते, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Modi-Adani Files News: डिलीट होण्यापूर्वी पाहून घ्या…; राज ठाकरेंनी शेअर केली मोदी-अदांनींवरील ‘ती’ वादग्रस्त डॉक्युमेंट्री

Web Title: Manoj jarange patil audio clip shivsena deemands inquiry vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • shivsena

संबंधित बातम्या

‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, ५०० कोटींचा दावा अन् एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा; Manoj Jarange Audio Clip मध्ये नेमकं काय?
1

‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, ५०० कोटींचा दावा अन् एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा; Manoj Jarange Audio Clip मध्ये नेमकं काय?

Mumbai Flyovers: मस्तच! सायन ते गोरेगाव-मुलुंडपर्यंत प्रवास होणार सुसाट! मुंबईकरांसाठी तीन महत्त्वाचे उड्डाणपूल सेवेत
2

Mumbai Flyovers: मस्तच! सायन ते गोरेगाव-मुलुंडपर्यंत प्रवास होणार सुसाट! मुंबईकरांसाठी तीन महत्त्वाचे उड्डाणपूल सेवेत

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप
3

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
4

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.