Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ‘त्या’ घटनेवरुन हर्षवर्धन सपकाळांची मागणी

१२ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2026 | 03:27 PM
फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; 'त्या' घटनेवरुन हर्षवर्धन सपकाळांची मागणी

फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; 'त्या' घटनेवरुन हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यात खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना भाजपा महायुती सरकार व प्रशासनाची काहीच तयारी दिसत नाही. मुंबई परिसरात मागील दोन तीन दिवसातील घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे, हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे झाले आहेत. या १२ मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पावर ७१८१ कोटी रुपये खर्च केले पण अवघ्या दोन महिन्याच्या आत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत १३ गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते, त्यात लोणावळा धरणाजवळील संरेखन, बोगद्यांची सुरक्षितता, भूगर्भीय स्थिरता आणि इतर तांत्रिक मुद्द्यांचा समावेश होता. या आक्षेपांवर काम न करता घाईघाईत काम उरकून, उद्घाटनांचे इव्हेंट करून श्रेयवाद आणि भ्रष्टाचार करून केलेल्या कामाची परिणती पिलर कोसळून वाहतूक बंद ठेवण्यात झाली. टक्केवारीचा मलिदा खाण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या उपस्थित केलेल्या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करून जनतेचा पैसा आणि जीव धोक्यात घालण्याची फडणवीस सरकारची वृत्ती दररोज समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा : डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मिसिंग लिंक टेस्टिंग परियड

मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो टेस्टिंग पिरियड आहे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्र्याचे हे विधान निर्लज्जपणाचे आहे. २०१४ पासून भाजपाचे सरकार आहे तेव्हापासून टेस्टिंगच सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित करून राम मंदिरातील चोरी लपवली जात आहे तसेच भ्रष्टाचार लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मिसिंग लिंकचा फियास्को भ्रष्टारामुळे झाला आहे. जेवढे जास्त इंजिन लावतील तेवढा भ्रष्टाचार वाढणार आहे. स्वतःच्या फायद्यासाठी भाजपा महायुती सरकारने मुंबईचीही वाट लावली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पंतप्रधांच्या विदेश दौऱ्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर झालेले आहेत, त्यामुळे तोंड लपवण्यासाठी ते विदेश वाऱ्या करत असतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीतरी भारतातही थांबावे, अशी कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावली.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded that a case be registered against devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Missing Link Project

संबंधित बातम्या

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
1

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
2

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
3

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
4

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.