Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये ‘आयआयएम’; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे प्रस्तावित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरच्या शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारणीली गती मिळाली आहे. या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन’ मधील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 06:10 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये ‘आयआयएम’; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये ‘आयआयएम’; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे प्रस्तावित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरच्या शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारणीली गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करून मोशी येथील गट क्रमांक ३२७ मधील २८ हेक्टर सरकारी जमीन नाममात्र वार्षिक भाडेपट्ट्याने संस्थेला उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन’ मधील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आला आहे.

 

शासनाने ३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार, मोशी येथील एकूण ३७ हेक्टर ०२ आर क्षेत्रापैकी २८ हेक्टर जमीन भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरला शैक्षणिक आणि प्रशिक्षण कॅम्पस उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जमिनीचा भाडेपट्टा सुरुवातीला ४९ वर्षांसाठी असून, त्यानंतर पुढील ४९ वर्षांसाठीही नूतनीकरणाची तरतूद केली आहे. यासाठी प्रतिवर्षी केवळ एक रुपया नाममात्र भाडे आकारण्यात येणार आहे.

यापूर्वी या जमिनीबाबत शासनाने बाजारमूल्यानुसार किंमत आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने २१ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर तो निर्णय रद्द करून शिक्षणाच्या व्यापक हिताचा विचार करत नाममात्र भाडेपट्ट्यावर जमीन देण्याचा सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : सततच्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या निर्णयानुसार संबंधित जमीन केवळ शैक्षणिक आणि प्रशिक्षणाच्या उद्देशासाठीच वापरता येणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय तिची विक्री, हस्तांतरण, तारण किंवा इतर कोणताही व्यावसायिक वापर करता येणार नाही. तसेच, संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राधान्य किंवा सवलतीचा विचार करण्याची अटही शासनाने घातली आहे. आता पिंपरी-चिंचवड परिसरात जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार असून, उद्योगनगरीला उच्च शिक्षणाचे नवे केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

“पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक नगरी न राहता शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र व्हावे, हा आमचा संकल्प आहे. शहराची ओळख ‘एज्युकेशन हब’ अशी व्हावी. मोशी येथे IIM चा कॅम्पस उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्याच दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्या शहरातच उपलब्ध होणार असून, उद्योग आणि शिक्षण यांचा मजबूत दुवा निर्माण होईल. -महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Web Title: Momentum has gathered for the establishment of an iim campus in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashra
  • mahesh landage

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
1

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
2

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश
3

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
4

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.