Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याची विद्यार्थ्यांची धक्कादायक तक्रार प्राप्त होताच अन्न सुरक्षा विभागाने पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातील कँटीनवर धाड टाकली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 12:42 PM
पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याची विद्यार्थ्यांची धक्कादायक तक्रार प्राप्त होताच अन्न सुरक्षा विभागाने पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातील कँटीनवर धाड टाकली. कँटीन तपासणीत मुदतबाह्य अन्नसाठा, अस्वच्छता, खाद्यरंगाचा वापर अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने कँटीनचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

 

सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दिनांक ३ जुलै रोजी सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे आणि कीर्तिका झाडे यांनी ही कारवाई केली. विद्यार्थ्यांनी पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याचे व्हिडिओसह अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागाने कँटीनची अचानक तपासणी केली.

कँटीन परवाना निलंबित

तपासणीदरम्यान कँटीनमध्ये मसाले व इडली रवा यांचा मुदतबाह्य साठा आढळून आला आहे. हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. याशिवाय अन्नपदार्थ तयार करताना खाद्यरंगाचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. कँटीन परिसरात सर्वत्र अस्वच्छता आढळून आल्याने अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर त्रुटी लक्षात घेऊन संबंधित कँटीनचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींमध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

तपासणीत काय आढळले?

  • मसाले व इडली रवा मुदतबाह्य अवस्थेत साठवलेले.
  • मुदतबाह्य अन्नसाठा जागेवरच नष्ट.
  • अन्नपदार्थांमध्ये खाद्यरंगाचा वापर.
  • कँटीनमध्ये अस्वच्छता व नियमांचे उल्लंघन.
हे सुद्धा वाचा : पुण्यात FDAची मोठी कारवाई! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

Web Title: The food safety department has taken major action after a worm was found in poha and a cockroach in rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
1

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
2

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
3

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
4

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.