Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर शहराच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील पूर्णवादनगर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने हादरलेल्या श्रीरामपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 01:39 PM
श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

Follow Us
Follow Us:

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहराच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील पूर्णवादनगर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने हादरलेल्या श्रीरामपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोविस तासांच्या आतच अभय सुरेश ससाणे (वय २२, रा. आझाद वाडी, श्रीरामपूर) या मुख्य आरोपीसह अक्षय किरण कपोते (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, श्रीरामपूर) या दोघांना अटक केली आहे. या घटनेत एकूण ६ आरोपींचा सहभाग असून, उर्वरित ४ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

 

गुरूवार २ जुलै रोजी दुपारी दोन टोळ्यांमधील जुन्या वैमनस्यातून पूर्णवादनगर चौकात शुभम यादव ऊर्फ कल्लू (वय २५) याच्यावर गोळीबार करून चाकूने सपासप वार करण्यात आले होते. हल्लेखोरांपासून जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत शुभम एका बंगल्यात शिरला होता. या प्रकाराने संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती. या धक्कादायक घटनेमुळे श्रीरामपूर शहर ‘क्राईम हब’ बनत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलिस प्रशासनाची धडक कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरचे पोलिस निरीक्षक विशाल खैरे व स्थानिक शानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अभय ससाणे आणि अक्षय कपोते या दोघांना ओळखले.

जखमी शुभम यादवची प्रकृती चिंताजनक

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभम यादववर सध्या अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक आहे. पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नाही.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगरमधील व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा, दोघांना घेतले ताब्यात; तापासातून धक्कादायक माहिती उघड

तपासाची चक्रे फिरली

या प्रकरणात सहभागी असलेल्या उर्वरित ४ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत. टोळीयुद्धामुळे घडलेल्या या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक खैरे यांनी व्यक्त केला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिस आता कठोर कारवाईच्या पवित्र्यात आहेत.

Web Title: The police have arrested two accused in the shrirampur firing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
1

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
2

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
3

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
4

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.