Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, नेमकं काय झाली चर्चा?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2026 | 05:31 PM
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, नेमकं काय झाली चर्चा?

हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, नेमकं काय झाली चर्चा?

Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधींच्या हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. हा सर्व दस्तावेज असताना जैन मुनीने गांधी हत्येचे समर्थन करावे हे योग्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधक बाधक चर्चा झाली, भविष्यातील जी आव्हाने आहेत त्या अनुषंगाने चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात योग्य संवाद रहावा यासाठी ही भेट होती. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाची या संदर्भातील भूमिका स्पष्ट आहे, राज्यसभा निवडणूक काँग्रेसने लढवावी व उद्धव ठाकरे हे मविआचे चेहरा आहेत, त्यांनी विधान परिषद लढवावी अशी भूमिका यापूर्वीच जाहीर केलेली आहे, असेही सपकाळ म्हणाले.

वरळीतील भाजपा मोर्चावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा मोर्चात सहभागी झालेल्या मंत्र्यांवर गुन्हे का दाखल केले जात नाहीत. या मोर्चामुळे वरळी भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे मोर्चात सहभागी मंत्र्यावरही गुन्हे दाखल करायला पाहिजेत. या मोर्चावर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचा व्हीडिओ आम्ही काँग्रेसच्या सोशल मीडियावर दाखवला तर या व्हिडिओचे चित्रिकरण कोणी केले अशी विचारणा करत भाजपाने पत्रकारांना धमक्या दिल्या, या दमदाटीचाही सर्वांनी निषेध केला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते व पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ‘पानसरेचे जे हाल केले, ते करू’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का? याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : मावळ खरेदी-विक्री संघाच्या विकासाला चालना मिळणार; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निधी मंजुरीचे आश्वासन

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has met uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
2

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
3

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
4

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.