मावळ खरेदी-विक्री संघासाठी विकास निधी देण्याचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आश्वासन दिले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maval News : वडगाव मावळ: सतिश गाडे : मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या कामशेत येथील जागेमध्ये शेतकरी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी तात्काळ निधी मंजूर करून देण्याचे आश्वासनही दिले असल्याची माहिती संस्थेचे सभापती किरण हुलावळे व उपसभापती सुनीता अमोल केदारी यांनी दिली.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनीता केदारी यांच्यासह संचालक माणिक गाडे, शहाजी कडु, गणेश विनोदे, बाजीराव वाजे, प्रमोद दळवी, शरद नखाते, विष्णु घरदाळे, आशा मारुती खांडभोर, सचिव किरण लोहर यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन निवेदन दिले व शेतकरी भवन उभारण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
हे देखील वाचा : शिवाजी कोण होता’ पुस्तकावरुन वाद! पानसरेंचे कसे हाल झाले तसे तुझे..: MLA संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
खरेदी विक्री संघाची कामशेत येथे प्रशस्त व मध्यवर्ती ठिकाणी जागा असून याच जागेमध्ये संस्थेच्या मालकीचे गोडाऊन, दुकाने व कार्यालय आहे. सबंधित इमारती ह्या जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून याच ठिकाणाहून संस्थेच्या माध्यमातून विविध कामकाज केले जात आहे. तसेच त्याठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, याशिवाय या इमारती अपुऱ्या पडत आहेत.
त्यामुळे याठिकाणी शेतकरी भवन उभारल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या दृष्टीने ही वास्तु अत्यंत महत्त्वाची ठरणार असून शेतकर्यांना सुलभ सुविधा उपलब्ध करून देता येतील तसेच एकप्रकारे संस्थेचीही उन्नती होणार आहे. त्यासाठी निधी मंजूर करावा व शेतकरी भवन उभारावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मावळात कामकाज ठप्प
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारल्यामुळे मावळ तालुक्यातील सह दुय्यम निबंध कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी, या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दस्त नोंदणीसह विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. विशेषतः खरेदीखत नोंदणीसाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, कार्यालय बंद असल्याचे समजल्यानंतर ते संपाबाबत चौकशी करून परत जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.






