Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 01:01 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला शेतकरी व शेती दोन्हीसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी आमदार नामदेवराव पवार, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला जनतेचे काहीही पडलेले नाही, ते फक्त मोजक्या उद्योगपतींचे हित जपण्यातच मग्न आहेत. ‘हम दो, हमारे दो’ या धोरणातून भाजपाचे सरकार अदानी आणि अंबानी या मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे चित्र देशात आहे. स्मार्ट मीटर लावून जनतेला लुटले जात आहे आणि या स्मार्ट मीटरचा पैसा अदानी व भाजपाच्या खिशात जात आहे. समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंकसह सर्व कामात पैसे खाल्ले, आता तर यांनी प्रभू रामाच्या मंदिरातील पैसेही खाल्ले. सिंधी समाजाने २०० चांदीच्या विटा दिल्या त्याचा हिशोब नाही, भक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले त्याचा हिशोब नाही. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमलेले १४०० कोटी रुपयेही गायब केले आहेत. देशाचा कारभार माजी सरसंघचालक गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकानुसार चालवला जात आहे.

हे सुद्धा वाचा : अमेरिकेत भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; धर्म विचारला अन् चाकूने सपासप वार

देशात आज ‘पैसा फेक, तमाशा देख’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी केवळ सत्तेचा आणि पैशाचा खेळ खेळत आहेत. भ्रष्टाचार, महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हीच काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned the government regarding farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Farmers
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प
1

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर…
2

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर…

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार;  मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड
3

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार; मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड

उत्रौली-वडगाव डाळ प्रकल्पाला पूर्णविराम, राज्य शासनाचा मोठा निर्णय; तरुणांची संधी हुकली
4

उत्रौली-वडगाव डाळ प्रकल्पाला पूर्णविराम, राज्य शासनाचा मोठा निर्णय; तरुणांची संधी हुकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.