Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यादीवर मोठी शंका, विधानसभा निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात…; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

विधानसभा निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात ६ लाख ५५ हजार ७०९ मते वाढली कशी? असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2025 | 11:54 AM
यादीवर मोठी शंका, विधानसभा निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात...; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

यादीवर मोठी शंका, विधानसभा निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात...; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक
  • विधानसभा निवडणुकीतील मतदानावरुन विचारला सवाल
  • सचिन सावंतांनी व्यक्त केली मोठी शंका
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाच्या संगनमताने केलेली वोटचोरी आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ देशासमोर आणला आहे. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या ४ महिन्यात राज्यात ४१ लाख मतदार वाढणे ही गंभीर बाब असली तरी १६ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या चार दिवसात ६ लाख ५५ हजार ७०९ मते कशी वाढली, हा प्रश्न निवडणूक आयोगाची आकडेवारी सादर करून काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात ९ कोटी २९ लाख ४३ हजार ८९० नोंदणीकृत मतदार होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार यादीच्या छाननी नुसार ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ एवढी मतदार संख्या झाली. याचा अर्थ या कालावधीत २४ लाख मतदार वाढले. त्यानंतर मतदार नोंदणी प्रक्रिया राज्यात सुरुच होती. आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार आहेत हे जाहीर केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यपद्धती प्रमाणे उमेवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या तारखेच्या १० दिवस अगोदर पर्यंत नवीन मतदार नोंदणी ही सुरु ठेवली जाते आणि त्यानंतर साधारणपणे ८ दिवस या अर्जाची छाननी करून अंतिम पुरवणी मतदार यादी ही उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केली जाते, त्यानुसार २९ ऑक्टोबरला निवडणूक अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता, त्याच्या १० दिवस अगोदर म्हणजे १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी सुरु ठेवण्यात आली होती, ही नोंदणी १६ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या चार दिवसाच्या कालावधीत चालली आणि त्यानंतर ८ दिवस नोंदणी थांबवली व छाननी करून अंतिम पुरवणी मतदार यादी जाहीर करण्यात आली, त्याचा आकडा ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर झाला आणि तो ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ होता, याचा अर्थ चार दिवसात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, हे अत्यंत संशायास्पद आहे. या वाढलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच पूर्ण वर्षभर राज्यात मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु होती. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर चार दिवसात मोठ्या प्रमाणात नोंदणी होणे हे अभूतपूर्व आहे, त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे असे सचिन सावंत म्हणाले.

हीच सदोष मतदार यादी १ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असल्याने या यादीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर शंका निर्माण झाली आहे तसेच विश्वासार्प्रहतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही मतदार यादी विरोधी पक्षांना पहायला सुद्धा दिली जात नाही, त्यावरचे आक्षेप नोंदवण्याची संधीही देण्यात येणार नाही, हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे, त्यामुळे विरोधी पक्षाने घेतलेली भूमिका योग्य आहे असेही सचिन सावंत म्हणाले.

Web Title: Congress leader has accused the election commission and bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Congress
  • Election Comission
  • sachin sawant

संबंधित बातम्या

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
1

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
2

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
4

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.