Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान यांची मागणी

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2026 | 11:50 AM
भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान यांची मागणी

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान यांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून भारताचा स्वाभिमान, अस्मिता गहाण ठेवली आहे. या ट्रेड डिलमुळे भारताचे मोठे नुसकान होणार असून, भारतातील कृषी क्षेत्र व आपला अन्नदाता पुर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

 

मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या न्याय सत्याग्रह आंदोलनाच्या पाचव्या दिवशी काँग्रेस कार्यसमितीचे (CWC) सदस्य, माजी कॅबिनेट मंत्री आरिफ नसीम खान यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन व शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कर्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नसीम खान पुढे म्हणाले की, मागील १२ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी देशात हिंदू मुस्लीमचा मुद्दा पुढे करून समाजात दुही माजवण्याचे काम करत आहे. भाजपा सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते धार्मीक मुद्दे उकरून काढत आहेत, पण जनतेला भाजपाचे षडयंत्र माहित आहे, देशातील बेरोजगारी, महागाई यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही. तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत पण मोदी सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपा सरकारच्या विरोधात तरुणांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नसीम खान यांनी केले.

भारतीय जनता पक्ष नियमबाह्य काम करते, केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये बेबंदशाही सुरु आहे. बीएमसीमध्ये विकास निधी वाटपात भेदभाव केला जात आहे. नगरसेवकांना विकास निधी देताना सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि विरोधकांना एक न्याय असा दुजाभाव केला जात आहे. सर्व पक्षांना समान विकास निधी मिळाला पाहिजे, असेही नसीम खान म्हणाले.

नसीम खान पुढे म्हणाले की, लोकशाहीत निवडणुका या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु गेल्या आठ-दहा वर्षापासून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत, अनेक तक्रारी होत आहेत, EVM वर अनेक राजकीय पक्ष व नेत्यांनी शंका देखील व्यक्त केल्या आहेत. मशीनवर शंका उपस्थित होत असेल तर त्याचे निराकरण झालं पाहिजे. निवडणूकीबाबत काही शंका असेल तर त्या शंकांचे निराकरण करणे हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोगाकडून कधीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. निवडणूक आयोग राजकीय पक्षासारखे वागत आहे, सत्ताधारी पक्षाचा अजेंडा चालवत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुक निकालानंतरही लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग दाद देत नाही म्हणून आम्ही निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार केली होती त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले आहेत. 16 व 17 एप्रिलला ईव्हीएम तपासणीचा कार्यक्रम निश्चित केला आहे, असे नसीम खान यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड

Web Title: Congress leader naseem khan has criticized the bjp and the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Congress
  • maharashtra
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीच्या ‘बिघाडी’ची चर्चा, काँग्रेस आणि उबाठामधील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर
1

Maharashtra Politics: ‘धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीच्या ‘बिघाडी’ची चर्चा, काँग्रेस आणि उबाठामधील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
2

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड
3

राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत
4

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.