Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

मंचरजवळील निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत चार घरांना आग लागल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी ( दि.१०) दुपारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2026 | 12:36 PM
मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

Follow Us
Follow Us:

मंचर  : मंचरजवळील निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत चार घरांना आग लागल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी ( दि.१०) दुपारी घडली आहे. या भीषण आगीत दागिने, संसारोपयोगी वस्तू, धान्य, शालेय साहित्य यांच्यासह सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. दरम्यान महावितरणने ग्रामस्थांनी केलेले आरोप फेटाळले आहे.

 

या दुर्घटनेत सुमन दशरथ निघोट यांच्या घरातील दहा तोळे सोने, रोख ३५ हजार रुपये, धान्य, शालेय पुस्तके आणि संसारोपयोगी भांडी सागवानी लाकडाचे छप्पर जळून खाक झाली. त्यांच्या एका कुटुंबाचे सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच संगीता महादेव चिखले यांचेही घर पूर्णतः जळाले असून सागवानी लाकडाचे छप्पर नष्ट झाल्याने त्यांचे अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले. दोन्ही कुटुंबाचा निवारा हिरावला गेला आहे. या आगीत निलेश नंदकुमार निघोट आणि सुभाष कोंडीबा निघोट यांच्या घराचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच सरपंच नवनाथ निघोट, निघोटवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष किसनराव निघोट, स्थानिक ग्रामस्थ व तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुंबई येथे अग्निशमन दलात काम करणारे ज्ञानेश्वर निघोट हे गावी यात्रेसाठी आले होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवत तीन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ते किरकोळ भाजले आहेत. महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत पाच दिवसापूर्वी व्होल्टेज चढ-उताराची तक्रार फोन व ऑनलाईनद्वारे करण्यात आल्याचे सरपंच नवनाथ निघोट यांनी सांगितले. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महावितरणचा सप्लाय बरोबर आहे. मीटरपर्यंत सप्लाय व्यवस्थित असल्याचे दिसून येत आहे. मीटरच्या पुढे अंतर्गत वायरिंगमध्ये काही दोष झाला असेल तर त्याची जबाबदारी महावितरणची नाही. त्यामुळे या झालेल्या दुर्घटनेची तपासणी करण्यासाठी महावितरणचे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सोमवारी किंवा मंगळवारी येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत अधिकृत बोलता येईल. -गफर शेख (सहाय्यक अभियंता, मंचर महावितरण)   महावितरणच्या हलगर्जपणामुळे येथील चार घरांचे शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाले आहे. याबाबत महावितरणने तातडीने संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत करावी. महावितरणकडे याबाबत लेखी तक्रार करण्यात आली असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे. याला महावितरणच जबाबदार आहे.अन्यथा निघोटवाडी ग्रामस्थ यापुढील विज बिल भरणार नाही. -शिवाजीराव निघोट (सदस्य, पंचायत समिती आंबेगाव तालुका)

Web Title: Four houses caught fire due to short circuit in nigotwadi near manchar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Fire Case
  • Fire News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
1

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
3

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
4

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.