Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithviraj Chavan: “… या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार”; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले हाेते. मात्र तसे झाले नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2025 | 08:44 PM
Prithviraj Chavan: "... या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार"; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan: "... या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार"; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Follow Us
Follow Us:

कराड : देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही, राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली, लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. याउलट राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले असून या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचे सांगत दोन दिवसात (दि. ३१ मार्चपर्यंत) सर्व कर्ज भरावे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याला प्रतिसाद दिला. जर सरकारने कापूस आणि सोयाबीनला हमीभाव िदला असता तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती. मात्र, इतर कोणत्याही गोष्टींच्या किमती  न वाढवता सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहे. राज्य सरकारही केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत आहे, या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.

एकवीसशे रुपयांच्या आश्वासनपूर्तीला हरताळ
चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले हाेते. मात्र तसे झाले नाही. शेतमालाला किमान हमीभाव मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेच्या पंधराशेवरून एकवीसशे रुपयांच्या आश्वासनपूर्तीला हरताळ फासला. राज्यावर चाळीस हजार कोटींचे कर्ज असल्याचे महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई सांगतात. मग योजना जाहीर करताना हे माहित नव्हते का? असा सवाल उपस्थित करत सरकारने लोकांना फसवले, आता जनताच त्यांचा विचार करेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ट्रम्प सरकारच्या दबावाला केंद्र सरकार बळी
ट्रम्प सरकारच्या दबावाला केंद्र सरकार बळी पडल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले, अमेरिकेमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ६० लाख लोकांना त्यांनी परत पाठवले. त्यांचा सन्मान राखला नाही. याबाबतच्या धोरणावेळी केंद्र सरकारने त्यांच्यासमोर लोटांगण घातले. आता दोन एप्रिल रोजी ट्रम्प सरकार अमेरिकेचे आयात-निर्यात धोरण ठरवणार आहे. यावेळी केंद्र सरकारने ताठर भूमिका घ्यायला हवी. जर यावेळीही केंद्राने त्यांच्यासमोर लोटांगण घातले, तर शेतकऱ्यांची प्रचंड अनास्था होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यास त्याचा महाराष्ट्र सरकारवर मोठा परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 न्यायाधीशांना अटकेपासून का थांबवले?
मोदींवर निशाणा साधताना चव्हाण म्हणाले, एका न्यायाधीशाच्या घरात कोट्यावधींची रक्कम सापडते. मात्र, याबाबतची माहिती का लपवली जाते? सामान्य जनतेला एक कायदा आणि न्यायाधीशाला दुसरा असे का?  सीबीआयचे अध्यक्ष मोदी आहेत, तर त्यांनी न्यायाधीशांना अटक करण्यापासून का थांबवले? असे सांगून ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला काळिमा फासणारी घटना असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Congress leader prithviraj chavan criticizes to cm devendra fadnavis karad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Maharashtra Government
  • pruthviraj chavhan

संबंधित बातम्या

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
1

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
2

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
3

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन
4

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.