Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही, CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन

CBT आणि Normalization पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी MPSC मुख्यालयासमोर सुरू असलेले काँग्रेसचे बेमुदत आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने उद्यापासून काळी फीत लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 07:08 PM
MPSC कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही, CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन

MPSC कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही, CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. ८ जुलै २०२६ पासून सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

आंदोलनाच्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी, पालक, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. बेलापूर परिसरातील नागरिक, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी यांनीही सह्यांच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मात्र, सलग दोन दिवस आंदोलन सुरू असूनही MPSC प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी कोणतीही चर्चा केलेली नाही किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण लोकशाही आंदोलनाकडे आयोगाकडून होत असलेल्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन

या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या, दि. १० जुलै २०२६ पासून आंदोलनात सहभागी होणारे सर्व विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या हातावर किंवा छातीवर काळी फीत लावून आंदोलनात सहभागी होतील. काळी फीत ही विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन व MPSC प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा शांततापूर्ण निषेध असेल.

दरम्यान, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) तलाठी भरती २०२३ प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशात सायबर गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या संशयासंदर्भात न्यायवैद्यकीय (Forensic) तपास करण्याचे, सायबर क्राईम विभागामार्फत संपूर्ण तपास करून लाभार्थी उमेदवारांचा शोध घेण्याचे आणि शासनाला निर्धारित कालावधीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका अधिक गंभीर ठरल्या असून CBT पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी अधिक भक्कम झाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पाठिंबा दिला आहे. अधिवेशनातही महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला आहे. तसेच MPSC अध्यक्षांकडे विद्यार्थी प्रतिनिधी आणि विविध विद्यार्थी संघटनांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यालाही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन केले असून, हा लढा केवळ विद्यार्थ्यांचा नसून महाराष्ट्राच्या भविष्यासाठीचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस दिगंबर राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आनंद सिंह, AIPC चे प्रतिनिधी डॉ. स्नेहल एम., AIPC finance vertical head, CA सतीश मूर्ती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज उपाध्याय, इंटक जिल्हाध्यक्ष महेश भणगे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुतार, बेलापूर ब्लॉक अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले.

महाघोटाळा! ‘आयुष्मान भारत’ योजनेच्या नावाखाली गरीबांची उघड्याडोक्याने लूट, ‘नवराष्ट्र’च्या दणक्याने प्रशासन हादरले

काँग्रेसने MPSC व राज्य शासनाला पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. तात्काळ विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून CBT व Normalization संदर्भातील निर्णय मागे घ्यावा, ऑफलाइन परीक्षा पद्धत कायम ठेवावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा हे लोकशाही आंदोलन आणखी व्यापक करण्याची जबाबदारी पूर्णपणे शासन व MPSC प्रशासनाची असेल.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन आणि काळी फीत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Congress mpsc cbt normalization protest day 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Congress
  • MPSC

संबंधित बातम्या

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी
1

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
3

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.