संग्रहित फोटो
पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक धोरण स्विकारले आहे. त्यात आता वाहतूक नियमभंगाचे उल्लंघन केल्यानंतर दंड असलेल्या तसेच त्यांनी तो न भरलेल्या वाहन मालकांकडे देखील लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यांना आता अधिकृत नोटीस पाठविली जात आहे. त्यानुसार संबंधितांनी ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दंड न भरल्यास वाहन चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहन धारकांनी थकित दंडाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, २६ ते २८ फेबु्रवारी आणि १ मार्च कालावधीत पोलिसांकडून नोटीस पाठवली जाणार आहे.
नागरिकांनो असा जमा करा दंड
तुमच्या वाहनावरील थकित दंडाची रक्कम जमा करण्यासाठी पीटीपी अॅपचा वापर करावा. तसेच, चौक-चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या अमलदाराकडे दंड जमा करण्यासंदर्भात विचारणा करावी. त्या ठिकाणीही दंड भरून घेतला जाणार आहे. तसेच आपल्या जवळच्या वाहतूक विभागातही दंड जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटसह अमलदारांकडे दंडाची रक्कम भरावी. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येणार आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना






