फोटो - सोशल मीडिया
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) विजयी झाले आहेत. अडबाले यांच्या विजयाने भाजपला नागपुरात मोठा दणका बसला आहे. या विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधान केले आहे.
भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी. — Nana Patole (@NANA_PATOLE) February 2, 2023
विधान परिषद निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. या मतदारसंघात नागो गाणार, सुधाकर अडबाले आणि राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत झाली. या विजयानंतर नाना पटोले यांनी ट्विट करत भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी.
विधान परिषद निवडणूक भाजपने केली होती प्रतिष्ठेची
नागपूर विधान परिषदेची जागा गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. पण आता भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. भाजपने ही विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या.






