दीनानाथ रुग्णालय प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश (Photo Credit- Social Media)
नांदेड: राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. निवडणुकीनंतरही अनेक बड्या नेत्यांनी पक्षांना रामराम केला. अशातच महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता त्यांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (21 मार्च) त्यांचा अधिकृत प्रवेश होणार असून, यामुळे मराठवाड्यातील अजित पवार गटाचे बळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत.त्यांच्या नांदेड दौऱ्यात भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करतील. त्यांच्यासोबत त्यांची सून मीनल खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोखरना हेदेखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहे. खतगावकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांना अप्रत्यक्ष शह देत, आपल्या मेव्हण्याला पक्षात सामील करून घेत एकाच वेळी दोन रणनीतिक फायदे मिळवल्याची चर्चा सुरू आहे.
भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळत नसल्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे खतगावकर यांनी म्हटले आहे. याशिवाय, विधानसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांवर झाला होता. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर ठपका ठेवत, भास्करराव पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना खतगावकर म्हणाले की, 23 तारखेला नरसी येथे 15 ते 20 हजार लोकांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा होईल. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोखरना, त्यांची सून डॉ. मीनल खतगावकर आणि 300 सरपंच, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच, त्यांना शिंदे गटाकडूनही पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली होती, मात्र सेक्युलर विचारसरणीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे पसंत केले. अजित पवार हे मेहनती नेते असून, महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येची त्यांना सखोल जाण आहे, असेही त्यांनी सांगितले.
नशेसाठीची बंटा गोळी विकणाऱ्याला ठोकल्या बेड्या; शिवणेतून घेतले ताब्यात
भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, आपल्या भागातील विकासाचे प्रश्न न सुटल्याने आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्यामुळे पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागला. नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हा बदल गरजेचा होता, असेही त्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानात मोठी तफावत पाहायला मिळाली. 29 हजार मतांचा फरक पडला, आणि चव्हाण कुटुंबीयांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळेच हा फरक झाल्याचा आरोप खतगावकर यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
खतगावकर म्हणाले की, अशोक चव्हाण हे त्यांचे नातेवाईक आणि मेव्हणे आहेत. वसंतराव चव्हाण यांचे बंधू आनंदराव चव्हाण यांच्या मुलीचा विवाह त्यांच्या कुटुंबात झाला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळू शकली असती, मात्र कुटुंबीयांमध्ये परस्परविरोधी उमेदवारी देणे संयुक्तिक वाटले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.