समृद्धी महामार्गाने टोलच्या माध्यमातून महाराष्ट्राला केले 'समृद्ध' (File Photo)
नागपूर : राज्यातील समृद्धी महामार्ग हा एक विशेष असा महामार्ग ठरत आहे. या महामार्गामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे. नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. असे असताना फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. यामधून सरकारला 72 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
2019 मध्ये महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली होती. आता या महामार्गाचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हा महामार्ग सर्वांसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर फक्त 8 तासांत पूर्ण होणार आहे. प्रत्येक महिन्याला समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. यामधून सरकारला 72 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. समृद्धी महामार्ग पाडव्याच्या आधी सर्वांसाठी खुला होणार आहे. 701 किमी लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि गेमचेंजर ठरणार आहे.
गुढी पाडव्याला 100 टक्के होणार खुला
गुढी पाडव्याला समृद्धी महामार्ग प्रवासासाठी 100 टक्के खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी यादरम्यान हा एक्सप्रेस वे सुरू आहे. अखेरचे 76 किमीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धघटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले होते. त्यानंतर हा महामार्ग टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. एका महिन्यात हा महामार्ग 100 टक्के सुरू होणार आहे.
फेब्रुवारीमध्ये 10 लाख वाहनांचा प्रवास
नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गावरून फेब्रुवारी महिन्यात तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या आहे. कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात टोलच्या माध्यमातून सुमारे 72 कोटी रूपयांचे उत्पन्न राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळाले आहे.
समृद्धी महामार्गावर 19 टक्के दरवाढ
समृद्धी महामार्गातील 701 किलोमीटरच्या या पूर्ण मार्गावरील फक्त 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर 19 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.