Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर जिल्हापरिषदेमध्ये ‘बदली’वरुन गोंधळ; अनेकजण पदाला चिटकून बसल्याने कर्मचारी संतापले

मुख्य कार्यकारी जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सीईओ यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख यांना कार्यमुक्त करावे, अशा मागणीने जोर धरला

  • By प्रीति माने
Updated On: May 30, 2025 | 03:37 PM
Controversy arises due to transfer of employees in Solapur Zilla Parishad

Controversy arises due to transfer of employees in Solapur Zilla Parishad

Follow Us
Follow Us:

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने – देशमुख यांना कार्यमुक्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान शुक्रवारी (दि.30) सीईओ जंगम यांनी आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्यामुळे झेडपीत कर्मचाऱ्यांची गर्दी फुलली होती.

सीईओ जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने – देशमुख यांची अक्कलकोटला बदली झाली आहे. अशात मुख्य कार्यकारी जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सीईओ यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख यांना कार्यमुक्त करावे, अशा मागणीने जोर धरला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार 30 व 31 मे रोजी ग्रामपंचायत, आरोग्य आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहेत. दरम्यान नर्सेस संघटनेच्या सुप्रिया जगताप यांनी आरोग्याचे प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केला आहे. आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश जाधव यांचा पंढरपूर पंचायत समितीमधील कालावधी जास्त झालेला असतानाही कमी दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे अनेक कर्मचाऱ्यांच्याबाबतीत घडले आहे. बदलीतून सुटका करून घेण्यासाठी नियमाचा आधार घेत असे अनेकजण पदाला चिटकून बसले असल्याचे सांगितले जात आहे.

स्वीय सहाय्यकावर रोष…

जिल्हा परिषदेत घडलेल्या अनेक प्रकारातूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुधाकर माने- देशमुख यांच्यावर आता आरोप होत आहे. वास्तविक सीईओकडे नदाफ व मल्लिकार्जुन तलवार हे दोन कार्यालयीन कामकाज करणारे दोन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी दिली तर सीईओचे कामकाज जनव्यापक होईल, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. तत्कालीन सीईओ आव्हाळे यांच्या कालावधीत देशमुख यांची नियुक्ती झाली. त्यावेळीच ते वादग्रस्त ठरले होते. यावेळी देशमुख यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला होता अशी चर्चा आहे. त्यामुळे आव्हाळे यांनी थोडे दिवस कामकाज पाहू असे म्हणून वेळ ढकलली. पण देशमुख यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे काय झाले? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर सीईओ म्हणून जंगम यांनी पदभार घेतला. या काळात अनेक गंभीर तक्रारी आल्या.

फायली होत आहेत गायब…

शासनाच्या आदेशानंतर सीईओ जंगम यांनी ई-फायलिंग सिस्टीम सुरु केली आहे. पण तरीही चक्क सीईओकडे येणाऱ्या फायली गायब होत असलेल्या तक्रारी आल्या आहेत. या फायली कोण गायब करीत आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. सीईओ कार्यालयातील महत्त्वाची माहिती बाहेर जाते. सार्वजनिक ठिकाणी ही माहिती कोणाकडून बाहेर जात आहे याचा शोध घ्यावा अशीही मागणी कर्मचाऱ्यातून केली जात आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शिक्षण विभागावर नजर

माध्यमिक शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी मागणी करून ही कर्मचारी दिले जात नाहीत. या विभागाला नवे कर्मचारी देण्यास खोडा घातला जात आहे. असा प्रकार कोण करत आहे तसेच या विभागात काम करणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांना वरदहस्त कोणाचा? हाही विषय संशोधनाचा झाला आहे. वादग्रस्त कर्मचाऱ्यांशी लांगेबांदे कोणाचे आहेत, वरिष्ठांच्या नावाने “लक्ष्मी’ दर्शनाचा आधार घेणाऱ्याचा सीईओ जंगम यांनी बंदोबस्त करावा नाही तर भविष्यात अडचणी वाढणार आहेत, असे कर्मचाऱ्यांमध्ये खुलेपणाने बोलले जात आहे.

सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या कार्याची झलक दाखवत पाच वर्षापासून अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकापासून करावी याही चर्चेला जोर धरला आहे

Web Title: Controversy arises due to transfer of employees in solapur zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • crime news
  • Solapur News
  • Zp Solapur

संबंधित बातम्या

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
4

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.