
बागेश्वर महाराज यांचे नागपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले होते- बागेश्वर महाराज
तुम्ही चार मुले जन्माला घाला, त्यातील एक आरएसएस ला द्या- बागेश्वर महाराज
Nagpur News: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि रामदास स्वामी ( Ramdas Swami) यांच्याशी संबंधित प्रसंग सांगितला. पण त्यांच्या या संदेशामुळे संपू्र्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने भारतदुर्गा मंदिर उभारण्यात येत असून, या मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला Mohan Bhagwat उपस्थित होते. शिलान्यासानंतर आयोजित धर्मसभेत बागेश्वर महाराज बोलत होते.
“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त के
यावेळी बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले होते, एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे आपले मुकुट देत म्हणाले, आता हे तुम्ही सांभाळा, हे राज्य तुम्ही सांभाळा आता मला विश्रांती घ्यायची आहे. आताकाही दिवस आम्हाला काहीच करायचे नाहीय. यावर हसत हसत रामदास स्वामी म्हणाले की, ठीक आहे…मी स्वीकारतो. पण मला एक सांगा, तुम्ही माझे कोण आहात.
यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. त्यावर रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी पुन्हा विचारलं, मग एका शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले, गुरु जो आदेश देतील, त्यचे पालन करणे. शिवाजी महाराजांच्या या उत्तरानंनंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, मी चालवणार…पण माझी तुम्हाला आज्ञा आहे, या राज्याचे संचालन तुम्हाला करायचे आहे. असा किस्सा बागेश्वर महाराज यांनी सांगितला.
पुणे जिल्हा परिषद परिसर आता ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’, नियम मोडल्यास…; प्रशासनाने दिला इशारा
जेव्हा संपूर्ण भारतावर कोणतेही संकट येते तर लोक जीव मुठीत धरून पळून जातात. पण आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता पळून जात नाही. तर तिथे जाऊन लोकांचे प्राण वाचवतो. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. तुम्ही चार मुले जन्माला घाला, त्यातील एक आरएसएस ला द्या, देशाच्या संरक्षणासाठी द्या, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.