Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘साईबाबा मुस्लीम आणि व्यभिचारी होते….’ चर्चेत येण्यासाठी ‘तलवारवाला बाबा’ची स्टंटबाजी? शिर्डीत नागरीक संतप्त, गुन्हा दाखल

Shirdi Saibaba News : हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2025 | 04:36 PM
'साईबाबा मुस्लीम आणि व्यभिचारी होते....' चर्चेत येण्यासाठी 'तलवारवाला बाबा'ची स्टंटबाजी? शिर्डीत नागरीक संतप्त, गुन्हा दाखल

'साईबाबा मुस्लीम आणि व्यभिचारी होते....' चर्चेत येण्यासाठी 'तलवारवाला बाबा'ची स्टंटबाजी? शिर्डीत नागरीक संतप्त, गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

Shirdi Saibaba News Marathi: तलवारवाला बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी देशभरातील हिंदू मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या विधानामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर तलवार बाबांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सिडकोची आर्थिक अध: पतनाकडे वाटचाल; मुदत ठेवीत २३२४ करोडची घट

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज महाराज यांनी नुकतेच साईबाबांबाबतचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी देशभरातील हिंदू मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्याचे आवाहन केले आहे. ‘काही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती आहेत. देशभरात साईबाबांची मंदिरे आहेत. सगळीकडे गल्ली गल्लीत साईंची मंदिरं आहेत. हिंदूंना काय झाले आहे. जुलैमध्ये या सर्व साईबाबांच्या मूर्ती हटवून टाका.

तसेच, ‘साईबाबांची मूर्ती हातोड्याने तोडून गटारात टाका. नदीत मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका. प्रत्येक मंदिरातून या मूर्ती हटवला. जर तुम्ही मूर्ती काढली नाही तर आम्ही त्या जबरदस्तीने हटवू. हे अभियान आम्ही फरिदाबाबमधून सुरू केले आहे. साईबाबा मुस्लिम होते ते मांसाहारी होते आणि व्यभिचारी होते. साईबाबा देव नाही. त्यांच्याशी आपला काहीच संबंध नाही.’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

संत युवराजांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग होण्याची शक्यता आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साईबाबांची बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शिर्डीतची संतप्त प्रतिक्रिया येथे आहे.

तर दुसरीकडे साईभक्तांसाठी दिलासादायक बातमी असून, साई संस्थेने या भाविकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होत आहे. सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना याचा फायदा मिळेल. साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साई भक्तांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे दर्शनासाठी रांगेत घालवला जाणारा वेळ वाचेल. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य साई भक्तांना होणारा त्रास आता कमी होईल. गर्दीत एक परिपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रेक दर्शन सुरू करण्याचा निर्णय साई बाबा संस्थानने घेतला आहे. यामध्ये व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी दर्शन सुविधेचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विद्यमान सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) गोरक्ष गाडीलकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

Matheran News : दरीत अडकून पडला कुत्रा अन् सलग तीन दिवस… ; सह्याद्री ट्रेकर्सने ‘असं’ केलं रेस्क्यू

Web Title: Controversy erupts over talwar wale baba sant yuvraj remarks on saibaba fir lodged in shirdi latest news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Nashik
  • shirdi

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिक हादरलं! लघुशंकेवरून वाद आणि 35 वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या
1

Nashik Crime: नाशिक हादरलं! लघुशंकेवरून वाद आणि 35 वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या

Nashik Crime: नाशिकमध्ये तरुणींना बंद खोलीत डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक; कॉलगर्ल बनवण्याचा दबाव, पैसेही लुटले
2

Nashik Crime: नाशिकमध्ये तरुणींना बंद खोलीत डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक; कॉलगर्ल बनवण्याचा दबाव, पैसेही लुटले

Prasad Shrikant Purohit: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना बढती, मिळाले ‘हे’ मोठे पद
3

Prasad Shrikant Purohit: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना बढती, मिळाले ‘हे’ मोठे पद

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला
4

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.