Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईतील लोकल स्थानकांवर मिळणार ‘गार वारा’! पश्चिम रेल्वेवर मोठ्या आकाराच्या एचव्हीएलएस पंख्यांची संख्या ९६ वर

रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एचव्हीएलएस पंखे लावण्यावर भर दिला आहे. यामुळे प्रवाशांची उकाड्यापासून सुटका होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2026 | 09:12 AM
मुंबईतील लोकल स्थानकांवर मिळणार 'गार वारा'! पश्चिम रेल्वेवर मोठ्या आकाराच्या एचव्हीएलएस पंख्यांची संख्या ९६ वर

मुंबईतील लोकल स्थानकांवर मिळणार 'गार वारा'! पश्चिम रेल्वेवर मोठ्या आकाराच्या एचव्हीएलएस पंख्यांची संख्या ९६ वर

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या उकाड्यात स्थानकांवर लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने मोठ्या आकाराचे एचव्हीएलएस (हाय व्हॉल्यूम लो स्पीड) पंखे बसविण्यावर भर दिला आहे. २०२६ मध्ये मीरा रोड, भाईंदर आणि कांदिवली स्थानकांवर एकूण १० एचव्हीएलएस पंखे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई उपनगरीय विभागातील या पंख्यांची संख्या आता ९६ झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

मोठ्या व्यासाचे हे पंखे कमी वेगाने फिरत मोठ्या प्रमाणात हवा सभोवतालच्या परिसरात पसरवतात. त्यामुळे पारंपरिक वेगवान पंख्यांच्या तुलनेत कमी वीज वापरून मोठ्या क्षेत्रात हवा खेळती राहते. स्थानकांवरील प्रतीक्षालय, फलाट आणि प्रवाशांच्या वर्दळीच्या ठिकाणी उष्णतेचा त्रास कमी करण्यास याचा फायदा होणार आहे.

मीरा रोडवर पाच, भाईंदरमध्ये तीन फॅन

मुंबई विभागात यंदा बसविण्यात आलेल्या १० पंख्यांपैकी सर्वाधिक पाच पंखे मिरा रोड स्थानकावर बसविण्यात आले आहेत. भाईंदर स्थानकावर तीन, तर कांदिवली स्थानकावर दोन पंखे बसविण्यात आले आहेत. स्थानकाची उपलब्ध जागा आणि परिसराची गरज लक्षात घेऊन ८, १०, १२, १४, १६ आणि २४ फूट व्यासाचे एचव्हीएलएस पंखे बसविण्यात येतात.

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

कमी वीज, मोठ्या परिसरात हवा

एचव्हीएलएस पंखे कमी वेगाने फिरत असल्याने त्यांचा आवाजही तुलनेने कमी असतो. त्यामुळे प्रवाशांच्या परिसरासोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणीही त्यांचा वापर करता येतो. मोठ्या क्षेत्रात एकसमान हवा खेळती ठेवण्याबरोबरच अनेक पारंपरिक पंख्यांची गरज कमी होऊ शकते.मुंबई विभागातील प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आणखी आठ एचव्हीएलएस पंखे सध्या बसविण्यात येत आहेत. योग्य ठिकाणांची निवड करून या पंख्यांची उभारणी केली जात असून, त्यातून स्थानक परिसरातील हवा खेळती ठेवण्यास मदत होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Cool breeze at mumbais local train stations number of large hvls fans on western railway reaches 96

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Local Trains
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.