Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प

सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवरील चर्चेदरम्यान जोरदार गदारोळ झाला. बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर खासदार गटाने सभागृहातून वॉकआऊट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2026 | 08:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत विविध विषयांवरील चर्चेदरम्यान जोरदार गदारोळ झाला. बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर खासदार गटातील सदस्यांनी सभागृहातून वॉकआऊट केला. त्यामुळे जवळपास तासभर सभेचे कामकाज ठप्प राहिले. त्यानंतर सदस्य परतल्यानंतर अखेरच्या १५ मिनिटांत तब्बल २०६ विषयांना मंजुरी देण्यात आली.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी हॉलमध्ये दुपारी स्थायी समितीची सभा सुरू झाली. सभासचिव वर्षा पाटील विषयपत्रिकेचे वाचन करत असताना अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीबाबत नगरसेविका सुजाता राजे महाडिक यांनी स्पष्टीकरण मागितले. त्यावरून बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांनी आक्षेप नोंदवत भूमिका मांडली. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

वाद वाढताच उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती ॲड. दत्ता बनकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार समर्थक नगरसेवकांनी सभागृहातून वॉकआऊट केला. या वॉकआऊटमध्ये नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, मागासवर्गीय विशेष कल्याण सभापती संकेत साठे तसेच नगरसे         विका सुजाता राजे महाडिक सहभागी झाल्या. सभेदरम्यान शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पाणीटँकर विक्रीबाबतही आरोप-प्रत्यारोप झाल्याने वातावरण अधिकच तापले. दरम्यान, भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.

गुंतवणुकीच्या आमिषाने ११.४६ लाखांची सायबर फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा

वॉकआऊटनंतर जवळपास तासभर सभा ठप्प राहिली. त्यानंतर सदस्य पुन्हा सभागृहात आल्यानंतर उर्वरित कामकाज पूर्ण करण्यात आले. मात्र, शेवटच्या अवघ्या १५ मिनिटांत २०६ विषयांना मंजुरी देण्यात आल्याने पालिकेच्या निर्णयप्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सभा संपल्यानंतर खासदार समर्थक नगरसेवकांनी जलमंदिर येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि सभेतील घडामोडींची माहिती दिली. या घटनेमुळे सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून, त्याचे आगामी राजकीय परिणाम काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Corporators supporting the mp walk out following a dispute in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Ashadhi Wari 2026: हरिनामाच्या गजरात सातारा दुमदुमला! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
1

Ashadhi Wari 2026: हरिनामाच्या गजरात सातारा दुमदुमला! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाची १५ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, प्रकरण अंतिम टप्प्यात
3

जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाची १५ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, प्रकरण अंतिम टप्प्यात

Satara News:’ठेकेदाराशी संपर्क साधा’ म्हणत प्रशासनाने झटकले हात; ठेकेदार कोण? कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये  खळबळ
4

Satara News:’ठेकेदाराशी संपर्क साधा’ म्हणत प्रशासनाने झटकले हात; ठेकेदार कोण? कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.