Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagwane Case: मोठी बातमी! वैष्णवी मृत्यू प्रकरणात बाप-दिराला ५ दिवसांची कोठडी

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राजकीय पार्श्वभूमीतून असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले. मागील सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2025 | 06:14 PM
Vaishnavi Hagwane Case: मोठी बातमी! वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे बाप-लेकाला ५ दिवसांची कोठडी

Vaishnavi Hagwane Case: मोठी बातमी! वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे बाप-लेकाला ५ दिवसांची कोठडी

Follow Us
Follow Us:

पुणे: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राजकीय पार्श्वभूमीतून असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले. मागील सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. आज दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आज सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना कोर्टात हजर केले. कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर  कोर्टाने बाप-लेकाला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात सासर राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळेस कोर्टात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्र हगवणेचे संतापजनक उत्तर

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात आज (२३ मे) सकाळी फरार आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधान पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकरणात नव्या घडामोडींचा वेग वाढला आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप सासरच्या मंडळींवर केला होता. यापूर्वीच तिचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे, आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती.

पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्रचा माजोरडेपणा

अटकेनंतर न्यायालयाच्या परिसरात पत्रकारांनी वैष्णवीचे सासरे राजेंद्रला काही प्रश्न विचारले, ‘हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?’ यावर राजेंद्रने नकारार्थी मान हलवत आणि हातांच्या इशाऱ्याने त्याला कोणताही पश्चाताप होत नसल्याचे मुजोरपणे सांगितले. पण त्याच्या या उत्तराने त्याच्याविरुद्धचा संताप आणखीच वाढला. राजेंद्र हगवणेच्या या वर्तणुकीमुळे आणि मुजोरीमुळे त्याच्याविरोधात सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे.

Vaishnavi Hagavane News: तुला पश्चाताप होतोय का…? पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्र हगवणेचे संतापजनक उत्तर

अटकेपूर्वी हॉटेलमध्ये बसून मटणावर ताव

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे अटकेपूर्वी दोघेही एका हॉटेलमध्ये मटण खाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले, ज्यामुळे प्रकरणाने नवे वळण घेतले आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांच्या सहा विशेष पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि स्वारगेट परिसरातून पहाटेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेमुळे बावधन पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या कारवाईमुळे तपासात वेग आला आहे.

 

Web Title: Court gave 5 days police custody to shashank and rajendra hagwane about vaishnavi sucide case crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Police
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.