Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीक विम्याच्या रकमेवर डल्ला! तासगावच्या जिल्हा बँक शाखेत बनावट सहीने अडीच लाख लंपास

तासगावमधील कवठेएकंद येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकरी खातेदाराच्या नावात फेरफार करून लाखो रुपये दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्स्फर केले.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 09:29 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • तासगावच्या जिल्हा बँक शाखेत चाललंय तरी काय?
  • शेतकरी खातेदाराच्या नावे जमा झालेल्या पीक विम्याचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्स्फर
  • बनावट सहीच्या आधारे अडीच लाख लंपास
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकरी खातेदाराच्या नावे जमा झालेल्या पीक विम्याच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तत्कालीन कॅशियरने खातेदाराच्या नावात बदल करून दुसऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली आणि बनावट सहीच्या आधारे ती रक्कम रोख स्वरूपात काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात संबंधित कॅशियरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बँकेचे अधिकारी प्रवीण अजू कोळी (रा. माहेश्वरी हॉलजवळ, विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल विलास वास्कर (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन कॅशियर-कम-एजंटाचे नाव आहे. हा प्रकार दि. ६ ते ८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा अपहार उघडकीस आला.

Chiplun News: राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’विरोधात भाजप आक्रमक; संसदेच्या अवमानाचा आरोप करत जोरदार निदर्शने

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी त्या काळात कवठेएकंद येथील शाखेत कॅशियर व एजंट म्हणून कार्यरत होता. शासनाच्या वतीने २०१२-२०१३ या कालावधीत एका शेतकरी खातेदाराच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. मात्र आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करत संबंधित खात्याच्या नावात फेरफार करून त्या खात्याला संदीप यशवंत गुरव असे नाव दिले. त्यानंतर त्या खात्यातील २ लाख ५८ हजार २१७ रुपये ही रक्कम संदीप गुरव यांच्या सेव्हिंग खात्यावर ट्रान्स्फर करण्यात आली.

त्यानंतर बँकेची बनावट स्लिप तयार करून त्यावर संदीप गुरव यांच्या नावाने बनावट सही करण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित रक्कम रोख स्वरूपात काढून घेत आरोपीने तिचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Jat Patrakar Bhavan: जतमध्ये ‘पत्रकार भवना’चे थाटात भूमिपूजन; बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ. गोपीचंद पडळकर

दरम्यान, बँकेच्या तपासणीत ही गंभीर आर्थिक अनियमितता समोर आल्यानंतर प्रकरण पोलिसांत दाखल करण्यात आले. या घटनेमुळे बँकेच्या व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Crop insurance fraud fake signature rs 2 5 lakh withdrawn at tasgaon district bank branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Bank Fraud
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘बटाट्याची चाळ’ पुन्हा जिवंत होणार; गद्य संवादांशिवाय रंगणार अनोखी मराठी संगीतिका
1

‘बटाट्याची चाळ’ पुन्हा जिवंत होणार; गद्य संवादांशिवाय रंगणार अनोखी मराठी संगीतिका

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार
2

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?
3

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच
4

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.